प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 07:15 IST2026-04-24T07:14:15+5:302026-04-24T07:15:20+5:30

तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान झाले.

'Voting record' in West Bengal, Tamil Nadu, voters' enthusiasm in assembly elections | प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह

प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता/चेन्नई : पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २९४ पैकी १६ जिल्ह्यांतील १५२ जागांसाठी प्रथमच विक्रमी ९२ टक्के मतदान झाले. तर, तामिळनाडूमध्ये २३४ जागांसाठी एकाच टप्प्यात झालेल्या निवडणुकीत ८५.०५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत विक्रम प्रस्थापित केला. प. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी १४३ जागांसाठी मतदान होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प. बंगालच्या मतदारांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या मतदानाबद्दल अभिनंदन करीत हे राज्यातील सत्ता परिवर्तनाचे संकेत असल्याचे म्हटले आहे. तर, जनतेने एसआयआर प्रक्रियेबद्दल मतदानातून रोष व्यक्त केल्याचे सांगत तृणमूलला १२५ ते १३४ जागा मिळतील, असा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. 

प. बंगालमध्ये हिंसाचार-मारहाणीच्या ५ घटना

प. बंगालमध्ये मतदानादरम्यान कुमारगंज येथे भाजप उमेदवार सुवेंदू सरकार यांना जमावाने पाठलाग करीत मारहाण केली. आसनसोलमध्ये भाजप उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला झाला, तर वीरभूमच्या बोधपूरमध्ये ईव्हीएम बंद पडल्याने लोकांनी पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली. मुर्शिदाबादमध्ये एका देशी बॉम्बच्या स्फोटात काही जण जखमी झाले. सिलीगुडीमध्ये जगदीशचंद्र विद्यापीठात भाजप-तृणमूल कार्यकर्ते भिडले.

Web Title : पश्चिम बंगाल, तमिलनाडु चुनाव में रिकॉर्ड मतदान, मतदाताओं में उत्साह

Web Summary : पश्चिम बंगाल में पहले चरण में रिकॉर्ड 92% मतदान हुआ। तमिलनाडु में 85.05% दर्ज किया गया। बंगाल चुनाव में हिंसा हुई। मोदी ने उच्च मतदान को परिवर्तन का संकेत बताया।

Web Title : Record voter turnout in West Bengal, Tamil Nadu elections.

Web Summary : West Bengal saw a record 92% turnout in the first phase. Tamil Nadu recorded 85.05%. Violence marred Bengal's polling. Modi hailed the high turnout as a sign of change.