Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 07:49 IST2026-04-24T07:49:04+5:302026-04-24T07:49:40+5:30

मुंबईतील गर्भश्रीमंतांकडे २५० कोटींहून अधिक संपत्ती

Mumbai: 35 percent of the country's rich people live in the city of Maya, Mumbai! | Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 

Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने पुन्हा एकदा आपली श्रीमंतीची ओळख अधोरेखित केली असून, देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत हे मुंबईत असल्याची माहिती नाइट फ्रँक या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या वेल्थ रिपोर्ट २०२६मधून पुढे आली आहे. या वाढीमुळे जागतिक स्तरावर गर्भश्रीमंतांच्या 
संख्येत भारत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. 

या अहवालानुसार, २५० कोटी रुपये आणि त्यापेक्षा अधिक मालमत्ता असलेल्या श्रीमंत व्यक्ती या मुंबईत राहात असल्याचे दिसून आले आहे. देशात एकाच शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर श्रीमंत व्यक्ती वास्तव्यास असलेले मुंबई हे एकमेव शहर ठरले आहे. 

देशातील वाढत्या आर्थिक प्रगतीचा सकारात्मक परिणाम संपत्ती निर्मितीवर दिसून येत असल्याचे ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांत भारताच्या  सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये सुमारे ३८ टक्के  वाढ झाली असून, याच कालावधीत देशातील संपत्ती निर्मितीलाही मोठा वेग मिळाला आहे. तंत्रज्ञान, उद्योग आणि भांडवली बाजार या क्षेत्रांनी या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेषतः माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्रातील विस्तार, औद्योगिक गुंतवणुकीत वाढ आणि शेअर बाजारातील तेजीमुळे उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींची संख्या वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात 
आला आहे. 

बांधकाम उद्योगालाही मिळाली चालना 

श्रीमंतांच्या या वाढत्या संख्येमुळे मुंबईच्या बांधकाम उद्योगालादेखील मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली असून, यामुळेच मुंबईत आलिशान घरांची निर्मिती तसेच खरेदी—विक्री गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर झाल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. 

श्रीमंतांना मुंबईचे आकर्षण

मुंबईत मोठ्या प्रमाणावर उद्योग, वित्तीय संस्था, शेअर बाजार आणि उच्च दर्जाच्या गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध असल्यामुळे देशभरातील आणि परदेशातील श्रीमंत गुंतवणूकदारांना मुंबई आकृष्ट करत असल्याचे दिसून आले आहे.

Web Title : मुंबई: देश के 35% सबसे अमीर लोग मायानगरी मुंबई में!

Web Summary : मुंबई, भारत की आर्थिक राजधानी, देश के 35% सबसे धनी व्यक्तियों का घर है। बढ़ती आर्थिक प्रगति धन सृजन को बढ़ावा देती है, खासकर प्रौद्योगिकी और वित्त में। इस वृद्धि ने मुंबई के निर्माण क्षेत्र को बढ़ावा दिया है, जो लक्जरी आवास की मांग से प्रेरित है, जिससे शहर उच्च निवल मूल्य वाले निवेशकों के लिए आकर्षण बना हुआ है।

Web Title : Mumbai: 35% of India's wealthiest reside in the city!

Web Summary : Mumbai, India's financial capital, is home to 35% of the country's wealthiest individuals. Surging economic progress fuels wealth creation, particularly in technology and finance. This surge has boosted Mumbai's construction sector, driven by demand for luxury housing, solidifying the city's appeal to high-net-worth investors.