Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 09:04 IST2026-04-24T09:00:42+5:302026-04-24T09:04:47+5:30
पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही

Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागात सकाळपासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. गुरुवारी दिवसभर पाणी येणार नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल अशीही माहिती देण्यात आली होती. मात्र सकाळपासून अजिबातच पाणी न आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
खडकवासला धरणातून येणाऱ्या पद्मावती पंपिंग स्टेशनच्या पाईपलाईनला मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यास विलंब होत आहे. दुपारी सुमारे १२ ते १ वाजेपर्यंत पाणी नागरिकांपर्यंत पोहोचेल. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
गुरुवारी दिवसभर पाणी नसल्याने घरोघरी पाणीसाठा पूर्णतः संपला आहे. अशातच आज सकाळपासून पाणी न आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पुणे महानगरपालिकेशी संपर्क साधला असता फोन उचलत नसल्याचे दिसून आले आहे.