IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 09:04 IST2026-04-24T09:03:38+5:302026-04-24T09:04:41+5:30
Anant Ambani Radhika Merchant Cute Video at MI vs CSK IPL 2026: सामना सुरू असतानाचा दोघांचा गोड व्हिडीओ व्हायरल

IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
Anant Ambani Radhika Merchant Cute Video at MI vs CSK IPL 2026: यंदाच्या हंगामात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि प्रत्येकी पाच वेळा ट्रॉफी उंचावलेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना रोमहर्षक होईल, अशी अपेक्षा होती. पण वानखेडेच्या मैदानात चेन्नईकरांनी १०३ धावांच्या फरकाने IPLच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला. मुंबई इंडियन्ससाठी हा पराभव लाजिरवाणा ठरला. IPLच्या आतापर्यंतच्या इतिहासात MI च्या संघाने कधीच शंभरपेक्षा अधिक धावांनी सामना गमावला नव्हता. त्यामुळे फॅन्स नाराज झाले. पण याचदरम्यान एका क्युट व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
मुंबई इंडियन्सचे सहमालक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी मुंबई विरूद्ध चेन्नई सामन्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये हजर लावली. सामना पाहताना हे दोघे बाजूबाजुला बसले होते. यावेळी या दोघांचा एक गोड क्षण कॅमेरात कैद झालेला दिसला. हे गोड कपल एकमेकांशी गप्पा मारताना दिसले तसेच त्यांच्यातील प्रेमही दिसून आले. पाहा व्हिडीओ-
CSK ची टॉप ५ मध्ये एन्ट्री, MI आठव्या स्थानावर
संजूच्या कमालीच्या फॉर्मसह कमालीच्या गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सचा संघ एक्स्प्रेसच्या वेगानं गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे या पराभवामुळे MI चा संघ आठव्या स्थानी असून प्लेऑफ्सचा त्याचा मार्ग खडतर झाला आहे. पंजाब किंग्स हा सहा सामन्यानंतर अपराजित राहणारा आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील पहिला संघ ठरला आहे. ६ पैकी पाच विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह ११ गुणांची कमाई करत श्रेयस अय्यरचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानवर आहे. राजस्थान रॉयल्सने ७ सामन्यातील ५ विजय आणि २ पराभवासह १० गुण कमावले असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत. आरसीबीच्या संघाने ६ पैकी ४ सामन्यातील विजय आणि २ पराभवासह ८ गुणांसह तिसऱ्या तर सनरायझर्स हैदराबाद ७ सामन्यातील ४ विजय आणि ३ पराभवासह ८ गुणांच्या कमाईसह चौथ्या स्थानावर आहे.