शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

SSC Exam Result 2026: यंदाही दहावीच्या निकालात मुलींची बाजी; कोकण विभाग अव्वल, जाणून घ्या, विभागनिहाय टक्केवारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 12:03 IST

SSC Exam Result 2026 राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७. ६२ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ८८.४१ टक्के लागला आहे

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या (एसएससी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेचा निकाल आज, शुक्रवार (दि.८) रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातून दहावीच्या निकालात ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल २ टक्क्यांनी घसरला आहे. मुलींचा निकाल ९४.९६ टक्के तर मुलांची ९०.५६ टक्केवारी आहे. यंदा दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. 

राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७. ६२ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ८८.४१ टक्के लागला आहे. कोकण विभागातून सर्वाधिक ९७.६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर च कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५५,०२६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४२,४७२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी १४,२०,४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  व त्यांची एकूण उत्त्तीर्णतेची टक्केवारी ९२.०९ आहे. राज्यातून  ६ हजार ६१२ शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर ४ लाख ८२ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे.  

विभागनिहाय टक्केवारी 

कोकण:९७.६२ टक्के

पुणे: ९४.२४ टक्के

नागपूर: ८९.०७ टक्के

मुंबई: ९४.९७ टक्के

कोल्हापूर: ९५.४७ टक्के

अमरावती: ९०.५० टक्के

नाशिक: ९०.५३ टक्के

लातूर: ८८.४२ टक्के

छत्रपती संभाजीनगर: ८८.४१ टक्के

राज्यात एकूण ४०२ कॉपीचे प्रकार

राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक ८२ कॉपीचे प्रकरण उघडकीस आली आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ७१ अमरावती ६७, नागपूर ४६, मुंबई ४४ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत तर लातूर आणि पुण्यात ४२ तर कोल्हापूर आणि कोकण विभागात ४ प्रकरणे समोर आली आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : SSC Result 2026: Girls excel; Konkan tops Maharashtra's divisional performance.

Web Summary : Maharashtra's SSC results show 92% pass rate, girls outperforming boys. Konkan leads with 97.62%, while Chhatrapati Sambhajinagar scores lowest at 88.41%. 14,20,486 students passed, with 6,612 schools achieving 100% results.
टॅग्स :Puneपुणेkonkanकोकणssc examदहावीSSC Resultदहावीचा निकालchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMaharashtraमहाराष्ट्रStudentविद्यार्थीEducationशिक्षण