शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
3
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
4
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
5
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
6
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
7
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
8
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
9
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
10
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
11
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
12
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
13
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
14
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
15
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
16
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
17
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
18
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
19
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
20
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 12:26 IST

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. याठिकाणी सरकार बनवण्यासाठी ११८ आमदारांची गरज आहे. त्यात टीव्हीकेकडे सर्वाधिक १०८ जागा आहेत

चेन्नई - तामिळनाडूत सरकार बनवण्याचा पेच कायम आहे. राज्यातील कुठल्याही पक्षाकडे बहुमत नसल्याने अद्याप सरकार बनवण्याचा मार्ग स्पष्ट झाला नाही. त्यात दक्षिण भारतातील या राज्याच्या राजकारणात अशा घटना घडत आहेत ज्याची कल्पना मागील ५० वर्षात कुणीही केली नसेल.

अभिनेता ते नेता बनलेल्या थलापती विजय याचा टीव्हीके पक्ष तामिळनाडूत सर्वात मोठा पक्ष बनला आहे. परंतु बहुमताचा आकडा त्यांना गाठता आला नाही. काँग्रेसने विजयच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिला आहे मात्र तरीही सरकार बनवण्यासाठी लागणाऱ्या बहुमताचा मॅजिक आकडा ते पूर्ण करू शकत नाहीत. तामिळनाडूत भाजपासोबत मिळून निवडणूक लढणारी AIADMK आता एनडीएतून बाहेर पडण्याची तयारी करत आहे. त्यात भाजपाशी आघाडी तोडून AIADMK तामिळनाडूत टीव्हीके आणि डिएमकेमध्ये कुणाशी हातमिळवणी करणार हा प्रश्न आहे.

AIADMK भाजपापासून वेगळे होणार?

तामिळनाडू विधानसभेत AIADMK आणि भाजपा यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. परंतु विजय यांच्या टीव्हीके पक्षाने राज्यात घवघवीत यश मिळवले. राज्यात टीव्हीकेने १०८ जागा जिंकल्या, परंतु सरकार बनवण्यासाठी ११८ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. काँग्रेसच्या ५ आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. ज्यातून त्यांचे संख्याबळ ११३ पर्यंत पोहचले आहे. विजय यांनी सत्ता स्थापनेचा दावा करत दोनदा राज्यपालांची भेट घेतली. परंतु अद्याप राज्यपालांकडून त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण मिळाले नाही. राज्यपालांनी विजय यांच्याकडे ११८ आमदारांची यादी मागवली आहे. जयललिता यांच्या निधनानंतर सलग चौथ्यांदा निवडणूक हरलेला AIADMK पक्ष आपलं राजकीय अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात भाजपासोबत असल्याने AIADMK ला सोबत घेण्यास विजय तयार नाही. त्यात आता AIADMK एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

भाजपाची पडद्यामागून खेळी

तामिळनाडूत विजय आणि काँग्रेस एकत्र आल्याने डीएमके नाराज आहे, तर भाजपाही खुश नाही. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याची भाजपाची रणनीती आहे तर AIADMK पक्षाच्या अस्तित्वाच्या रणनीतीवर काम करत आहे. जर AIADMK यांनी एनडीएपासून वेगळे होण्याची भूमिका घेतली तर ते कुणासोबत जातील अशी चर्चा आहे. भाजपा आणि AIADMK वेगळे झाले तर विजय यांच्या टीव्हीके पक्षाला त्यांच्यासोबत सरकार बनवण्यात काही अडचण नाही कारण विजय यांनी आधीच त्यांची विचारधारा स्पष्ट केली आहे. डिएमके त्यांचा राजकीय विरोधक तर भाजपा वैचारिक विरोधक असल्याचे विजय यांनी सांगितले आहे. त्यात तामिळनाडूत काँग्रेस आणि टीव्हीके यांच्यातील मैत्री भाजपाला रुचली नाही. काँग्रेसने विजयसोबत जात सरकार बनवावे असं भाजपाला वाटत नाही. त्यामुळेच DMK आणि AIADMK आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. 

परंतु डिएमके प्रमुख एम. के स्टॅलिन आणि जुने नेते या प्रयोगापासून लांब राहत आहेत. या आघाडीने समर्थकांमध्ये आक्रोश निर्माण होईल अशी भीती त्यांना आहे. त्यामुळेच डिएमकेकडून विजय यांना सरकार चालवू द्यावे, त्यांना ६ महिने वेळ द्यावा अशी मागणी होऊ लागली आहे. त्यातच डिएमके आणि AIADMK एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा केला तर आमचे सर्व १०८ आमदार सामुहिक राजीनामे देतील अशी घोषणा विजय याने केली. विजय यांच्या या खेळीने तामिळनाडूत जनता आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरू शकतात असं बोलले जाते. त्यामुळे तामिळनाडूत सध्या राजकीय 'दंगल' सुरू आहे.

विधानसभेतील नंबर गेम काय?

दरम्यान, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. याठिकाणी सरकार बनवण्यासाठी ११८ आमदारांची गरज आहे. त्यात टीव्हीकेकडे सर्वाधिक १०८ जागा आहेत. दुसरीकडे डिएमके आघाडीकडे ७४ जागा, ज्यात डिएमकेचे ५९ आणि इतर पक्षाचे १० आमदार आहेत. काँग्रेसचे ५ आमदार टीव्हीकेसोबत गेलेत. परंतु डिएमकेसोबत डावे, मुस्लीम लीग पाठबळ आहे. AIADMK आघाडीकडे ५३ जागा असून इतरांकडे ६ जागा आहेत. त्यामुळे विजय यांना बहुमत मिळवण्यात यश येते का हे पाहणे गरजेचे आहे. 
 

English
हिंदी सारांश
Web Title : Tamil Nadu political turmoil: TVK, Congress alliance irks BJP.

Web Summary : Tamil Nadu faces a hung assembly. TVK leads but lacks a majority. Congress supports TVK, but it's insufficient. AIADMK considers leaving NDA. BJP strategizes to keep Congress out of power, fueling political instability.
टॅग्स :Assembly Election Resultsविधानसभा निवडणूक निकाल २०२६TamilnaduतामिळनाडूThalapathy Vijayथलपती विजयElectionनिवडणूक 2026BJPभाजपाcongressकाँग्रेस