शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
3
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
4
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
5
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
6
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
7
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
8
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
9
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
10
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
11
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
12
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
13
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
14
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
15
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
16
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
17
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
18
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
19
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
20
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
Daily Top 2Weekly Top 5

केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 10:50 IST

६३ आमदारांव्यतिरिक्त माकन आणि वासनिक यांनी काँग्रेस खासदार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या पसंती जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेतल्या.

नवी दिल्ली - केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर तिथे सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय समितीने पाठवलेल्या निरिक्षकांनी केरळमधील आमदारांसोबत वन टू वन भेट घेतली. या भेटीत काँग्रेसच्या ६३ आमदारांपैकी ४७ आमदारांनी वेणुगोपाल यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. या ४७ आमदारांमध्ये केरळचे प्रदेशाध्यक्ष सन्नी जोसेफ यांचाही समावेश आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत पार्टी हायकमांडकडून केरळच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या नावाची घोषणा होऊ शकते.

सन्नी यांच्यासोबतच संदीप जी वारियर, सजीव जोसेफ, टी.ओ मोहन आणि उषा विजयन यांनीही वेणुगोपाल यांच्या नावाच्या प्रस्तावाला सहमती दिली आहे. केरळमधील नवनियुक्त आमदारांपैकी बहुतांश वेणुगोपाल यांच्या नावाला समर्थन देत असल्याने या पदासाठी दुसरे प्रमुख दावेदार रमेश चेन्नीथला यांना मोठा झटका बसला आहे. यात आय.सी बालकृष्णन यांनी वेणुगोपाल आणि चेन्नीथला या दोघांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. माजी विरोधी पक्षनेत्याला ८ आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. या पदासाठी ज्यांना लोकप्रिय उमेदवार म्हणून पाहिले जात अशा विद्यमान विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांना सहा आमदारांचा पाठिंबा आहे. सतीशन आणि चेन्नीथला या दोघांनीही निरीक्षकांची भेट घेऊन या पदासाठी आपला दावा सांगितला आहे. वेणुगोपाल या बैठकीला उपस्थित नव्हते.

६३ आमदारांव्यतिरिक्त माकन आणि वासनिक यांनी काँग्रेस खासदार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या पसंती जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेतल्या. तीन माजी केपीसीसी अध्यक्षांनी सतीशन यांना पाठिंबा दिला तर अनेक वरिष्ठ नेत्यांनी वेणुगोपाल यांना पाठिंबा दिला. नवी दिल्लीत परतलेले निरीक्षक आपला अहवाल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सादर करतील. गरज भासल्यास हायकमांड सन्नी जोसेफ, केपीसीसीचे तीन कार्याध्यक्ष तसेच सतीशन आणि चेन्नीथला यांना चर्चेसाठी बोलावतील.

दरम्यान, काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पुढील मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करण्याचा अधिकार खर्गे यांना एकमताने देण्यात आला. योग्य प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हायकमांड शनिवार किंवा रविवारपर्यंत पुढील मुख्यमंत्र्यांची घोषणा करतील आणि घोषणेनंतर दोन दिवसांच्या आत नवीन मुख्यमंत्री, काँग्रेसचे दोन वरिष्ठ नेते आणि इतर यूडीएफ घटक पक्षांच्या नेत्यांसह शपथविधी सोहळा पार पडेल असं सूत्रांनी सांगितले आहे. 
 

English
हिंदी सारांश
Web Title : Kerala CM race: Gandhi family's 'special' man? 47 MLAs favor name.

Web Summary : Following Kerala's election, 47 MLAs favor Venugopal for CM, including state president Sunny Joseph. High command will decide soon. Ramesh Chennithala faces setback.
टॅग्स :Assembly Election Resultsविधानसभा निवडणूक निकाल २०२६Kerala Assembly Election 2026केरळ विधानसभा निवडणूक २०२६congressकाँग्रेस