HDFC Investment Scheme: जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसोबत चांगला परतावा हवा असेल, तर फिक्स्ड डिपॉझिट हा एक विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो. देशातील मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेली एचडीएफसी बँक (HDFC Bank) आपल्या ग्राहकांना विविध कालावधीच्या एफडी योजनांवर आकर्षक व्याजदर देत आहे. जर तुम्ही बँकेच्या ५५ महिन्यांच्या एफडी योजनेत ₹५५,००० गुंतवले, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला किती परतावा आणि किती व्याज मिळेल, हे आपण एका गणनेच्या आधारे सहज समजू शकतो.
५५ महिन्यांच्या FD वर किती मिळत आहे व्याज?
बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, सध्या एचडीएफसी बँक ५५ महिने किंवा ४ वर्षे ७ महिने कालावधीच्या एफडी योजनेवर सामान्य ग्राहकांना ६.४०% व्याजदर देत आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के जास्त म्हणजेच ६.९०% व्याज दिलं जात आहे. हे व्याजदर ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीसाठी लागू आहेत. तुम्ही या बँकेत ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी पैसे जमा करू शकता. वेगवेगळ्या कालावधीसाठी व्याजदर वेगवेगळे असतात.
₹५५,००० च्या FD वरील परताव्याचे गणित
सामान्य ग्राहकांसाठी : जर तुम्ही एक सामान्य ग्राहक असाल आणि ५५ महिने (४ वर्षे ७ महिने) कालावधीसाठी ₹५५,००० ची एफडी केली, तर ६.४०% व्याजदरानुसार तुम्हाला मॅच्युरिटीवर व्याजापोटी एकूण ₹१८,५९४ मिळतील. अशा प्रकारे, तुमची मूळ रक्कम आणि व्याज मिळून तुमच्याकडे एकूण ₹७३,५९४ चा फंड जमा होईल.
ज्येष्ठ नागरिकांसाठी : जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तर ६.९०% व्याजदरानुसार तुम्हाला व्याजापोटी ₹२०,२७३ मिळतील. म्हणजेच, ५५ महिन्यांच्या कालावधीनंतर तुमच्याकडे एकूण ₹७५,२७३ जमा असतील.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : HDFC Bank offers attractive FD rates. A ₹55,000 investment in a 55-month FD yields ₹18,594 in interest for general customers and ₹20,273 for senior citizens, at 6.40% and 6.90% interest rates respectively. Total maturity amounts to ₹73,594 and ₹75,273.
Web Summary : एचडीएफसी बैंक आकर्षक एफडी दरें प्रदान करता है। 55 महीने की एफडी में ₹55,000 का निवेश सामान्य ग्राहकों के लिए 6.40% ब्याज दर पर ₹18,594 और वरिष्ठ नागरिकों के लिए 6.90% ब्याज दर पर ₹20,273 का ब्याज देता है। कुल परिपक्वता राशि ₹73,594 और ₹75,273 है।