टोकियो: जपानमध्ये शालेय विद्यार्थिनींनी वापरलेल्या जुन्या आणि घासलेल्या 'इंडोर बुटां'च्या ऑनलाइन विक्रीने एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. सोशल मीडियावर या ट्रेंडवर तीव्र टीका करण्यात येत आहे. याला विकृत मानसिकतेशी जोडून पाहिले जात आहे. विशेषतः मुलींची नावे लिहिलेले आणि जास्त वापरलेले जुने बुट हजारो रुपयांना विकले जात असल्याने खळबळ उडाली आहे.
जपानमध्ये स्वच्छता आणि सन्मानाला अत्यंत महत्त्व दिले जाते. त्यामुळे घराप्रमाणेच शाळा आणि महाविद्यालयांच्या आत बाहेरचे पादत्राणे वापरण्यास मनाई असते. विद्यार्थी शाळेत प्रवेश करताना आपले बाहेरचे बूट बदलून आत वापरण्यासाठी विशेष हलके आणि पांढऱ्या रंगाचे बूट घालतात, ज्यांना 'उवाबाकी' म्हटले जाते. साधारणपणे पदवीदान समारंभ किंवा शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर विद्यार्थी आपले जुने शैक्षणिक साहित्य ऑनलाइन विकतात. मात्र, अलीकडे काही अशा बुटांची विक्री समोर आली आहे जी धक्कादायक आहे.
अव्वाच्या सव्वा किमती
सायटामा प्रांतातील एका जोडीची किंमत ६,९०० येन (सुमारे ४४ डॉलर) लावण्यात आली होती. काही रिपोर्ट्सनुसार, लिलावामध्ये या बुटांची किंमत ५०,००० येन (सुमारे ३२० डॉलर - २६,००० रुपयांहून अधिक) पर्यंत पोहोचली आहे. खरेदीदार प्रामुख्याने असे बूट शोधत आहेत ज्यावर मुलींची नावे स्पष्ट दिसत असतील आणि जे जास्त घासलेले किंवा अस्वच्छ असतील.
विकृत मानसिकतेवर टीका
नेटकऱ्यांच्या मते, हे केवळ जुन्या वस्तूंची विक्री नसून तरुण मुलींना 'ऑब्जेक्ट' म्हणून पाहणाऱ्या चुकीच्या मानसिकतेचे लक्षण आहे. अनेक जणांनी याला 'मेमरी' (आठवण) न म्हणता मुलांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर धोका मानले आहे. जपानमध्ये या मुद्द्यावर आता मोठी राष्ट्रीय चर्चा सुरू झाली आहे.
Web Summary : Japan faces controversy over online sales of used schoolgirl 'indoor shoes'. Prices soar for worn shoes with visible names. Critics decry the trend as objectifying young girls and a potential safety risk, sparking national debate.
Web Summary : जापान में छात्राओं के इस्तेमाल किए हुए 'इंडोर जूतों' की ऑनलाइन बिक्री पर विवाद। नाम वाले घिसे जूतों की कीमतें बढ़ीं। आलोचकों ने इस प्रवृत्ति को लड़कियों को वस्तु बनाने और सुरक्षा जोखिम बताया, जिससे राष्ट्रीय बहस छिड़ गई।