Maharashtra SSC 10th Result 2026 Declared: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या (एसएससी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेचा निकाल आज, शुक्रवार (दि.८) रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातून दहावीच्या निकालात ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल २ टक्क्यांनी घसरल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी पत्रकार परिषेदतून दिली आहे.
कोकण विभागातून सर्वाधिक ९७.६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर च कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५५,०२६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४२,४७२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी १४,२०,४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. व त्यांची एकूण उत्त्तीर्णतेची टक्केवारी ९२.०९ आहे. राज्यातून ६ हजार ६१२ शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर ४ लाख ८२ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे.
मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा ५.४० ने जास्त
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण १०,०३१ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,९१२ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी ९,०४२ दिल्यां विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.२२ आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्याथ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.६२%) सर्वाधिन असून सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (८८.४१ १७) आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.९६ असून मुलांची टक्केवारी ८९.५६ आहे. म्हणजेच मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा ५.४० ने जास्त आहे. माध्यमिक शालान्त (इ.१० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ करीता एकूण ६४ विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी एकूण २० विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे.
१०वी चा निकाल कुठे पाहाल?
विद्यार्थ्यांना आपला निकाल राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.
1. https://results.digilocker.gov.in
2. https://mahahsscboard.in
3. https://sscresult.mkcl.org
त्याचप्रमाणे डीजीलॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी आठ लाख ६५ हजार ७४० विद्यार्थी, सात लाख ४९ हजार ७३६ विद्यार्थिनी आणि १५ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील एकूण २३ हजार ६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, संपूर्ण राज्यातील पाच हजार १११ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.
Web Summary : Maharashtra's SSC results are out, with 92% passing, a slight drop from last year. Kokan topped with 97.62%. Over 16 lakh students appeared; girls outperformed boys. Results available online.
Web Summary : महाराष्ट्र एसएससी के नतीजे घोषित, 92% उत्तीर्ण, पिछले वर्ष से थोड़ी गिरावट। कोंकण 97.62% के साथ शीर्ष पर। 16 लाख से अधिक छात्र उपस्थित हुए; लड़कियों ने लड़कों से बेहतर प्रदर्शन किया। परिणाम ऑनलाइन उपलब्ध।