शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
4
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
5
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
6
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
7
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
8
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
9
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
10
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
11
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
12
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
13
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
14
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
15
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
16
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
17
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
18
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
19
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
20
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 08:15 IST

या जहाजावर एकूण १४९ लोक असून ते २३ वेगवेगळ्या देशांचे नागरिक आहेत असं एमव्ही होंडियस जहाजाची डच ऑपरेटर कंपनी ओशनवाइड एक्सपेडिशन्सने माध्यमांना सांगितले. 

जिनिव्हा - जीवघेण्या हंता व्हायरसबाबत जगभरातील १२ देशांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या देशांना पुढील धोक्याबाबत सूचना देत सावध केले आहे. एका क्रूझ जहाजामुळे या सर्व देशांवर नवे संकट ओढावले आहे. हंता व्हायरसची प्रकरणे गंभीर होण्यापूर्वीच काही प्रवासी जहाजातून उतरून आपापल्या देशात परतले, ज्यामुळे तेथे विषाणू पसरण्याचा धोका वाढला असल्याचं WHO ने सांगितले आहे.

Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं

कोणत्या देशांना WHO ने जारी केला इशारा?

वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी एका क्रूझवरील प्रादुर्भावाशी संबंधित हंता व्हायरसशी निगडित ५ प्रकरणांची पुष्टी केली. तर इतर तीन प्रकरणे अद्याप संशयास्पद आहेत. श्वासाशी संबंधित आजाराशी एकूण आठ प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात तीन मृत्यूंचा समावेश आहे. यापैकी पाच प्रकरणे अँडीज व्हायरसशी संबंधित असल्याची पुष्टी झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आता त्या १२ देशांना अलर्ट केले आहे, ज्यांचे नागरिक प्रवासावेळी दक्षिण अटलांटिक महासागरातील सेंट हेलेना या दुर्गम ब्रिटिश प्रदेशात 'एमव्ही होंडियस' (MV Hondius) या क्रूझमधून खाली उतरले होते. या १२ देशांमध्ये कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड्स, न्यूझीलंड, सेंट किट्स अँड नेव्हिस, सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुर्की, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांचा समावेश आहे.

WHO संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी जिनिव्हा येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले की, जर सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजना त्वरित आणि योग्यरित्या केल्या गेल्या तर सध्या या रोगाचा प्रसार 'मर्यादित' राहील अशी अपेक्षा आहे. अनेक देश प्रवासी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करत असल्याने आणखी प्रकरणे समोर येऊ शकतात असंही त्यांनी म्हटलं. अर्जेंटिनामधील प्रयोगशाळांमधून सुमारे २,५०० हंता व्हायरस चाचणी किट्स पाच देशांमध्ये पाठवले जात आहेत. तर या जहाजावर एकूण १४९ लोक असून ते २३ वेगवेगळ्या देशांचे नागरिक आहेत असं एमव्ही होंडियस जहाजाची डच ऑपरेटर कंपनी ओशनवाइड एक्सपेडिशन्सने माध्यमांना सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Hantavirus Alert: WHO warns 12 countries of potential outbreak.

Web Summary : WHO alerts 12 countries after Hantavirus cases linked to a cruise ship. Passengers disembarked in these nations, raising spread concerns. Five confirmed cases, three deaths. Health measures urged to limit spread.
टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटना