नाशिक येथील टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या २५ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निदा खानला गुरुवारी रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. तिच्या अटकेमुळे या प्रकरणातील अनेक मोठी गुपिते उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निदा खान ही छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव येथील कैसर कॉलनीमध्ये आपल्या आई-वडील आणि भावासोबत लपून बसली असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी सापळा रचून तिला ताब्यात घेतले. अटकेनंतर तिला न्यायाधीशांसमोर हजर करून तिची ट्रान्झिट रिमांड मिळवण्यात आली असून, आता पोलीस तिला पुढील तपासासाठी नाशिकला घेऊन रवाना झाले आहेत.
निदा खान ही टीसीएस कंपनीत एचआर म्हणून कार्यरत होती. तिच्यावर र्मांतरासाठी दबाव, मानसिक आणि लैंगिक छळ यांसारख्या अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच एका पीडित महिलेचे नाव बदलून तिला नोकरीच्या बहाण्याने मलेशियाला पाठवण्याचा कट रचल्याचाही आरोप तिच्यावर आहे. निदा खानविरुद्ध आतापर्यंत सुमारे ४० गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणात धर्मांतरासाठी होणारा फंडिंग नेमका कुठून येत होता आणि मालेगाव तसेच मलेशियातील रॅकेटशी तिचे काय संबंध आहेत? याचा उलगडा होण्याची शक्यता विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी व्यक्त केली. याच प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. निदा खानच्या अटकेनंतर आता या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचे हात आहेत, हे लवकरच स्पष्ट होईल.
Web Summary : Nida Khan, wanted in the Nashik TCS case involving forced conversions, has been arrested in Chhatrapati Sambhajinagar. Accused of multiple offenses, including human trafficking to Malaysia, her arrest may expose a larger network and funding sources. Police investigation continues to uncover the extent of the racket.
Web Summary : जबरन धर्मांतरण के नासिक टीसीएस मामले में वांछित निदा खान को छत्रपति संभाजीनगर में गिरफ्तार किया गया। मलेशिया में मानव तस्करी सहित कई अपराधों की आरोपी, उसकी गिरफ्तारी से एक बड़े नेटवर्क और धन के स्रोतों का पता चल सकता है। पुलिस जांच जारी है।