शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
4
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
5
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
6
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
7
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
8
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
9
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
10
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
11
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
12
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
13
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
14
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
15
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
16
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
17
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
18
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
19
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
20
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
Daily Top 2Weekly Top 5

TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 08:59 IST

Nashik TCS Case: नाशिकमधील TCS प्रकरण समोर आल्यापासून पोलीस निदा खानच्या शोधात होती. २५ मार्चपासून ती सातत्याने फरार होती.

नाशिक - नाशिक शहरातील चर्चेत असणारं TCS धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणी मुख्य महिला आरोपी निदा खान हिला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. मागील २५ दिवसांपासून निदा खान पोलिसांच्या नजरेतून वाचत छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरात लपून बसली होती. या अटकेनंतर तिचा पहिला फोटो समोर आला आहे.

माहितीनुसार, निदा खान गेल्या काही दिवसांपासून कॅसर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये राहत होती. विशेष म्हणजे तिच्यासोबत तिचे ४ नातेवाईकही फ्लॅटमध्ये सोबत राहायचे. पोलिसांना तिच्या लोकेशन बदलाची माहिती वेळोवेळी मिळायची परंतु प्रत्येक वेळी तपास यंत्रणेच्या तावडीतून वाचण्यात तिला यश येत होते. अखेर नाशिक क्राइम ब्रांच आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तिला ताब्यात घेण्यात आले. रात्री ११.३० वाजता पोलिसांच्या टीमने तिला अटक केली. या अटकेनंतर सर्वात आधी तिची मेडिकल चाचणी करण्यात आली. त्यानंतर ट्रांजिट वॉरंट प्रक्रियेत तिला संभाजीनगर कोर्टासमोर हजर केले. आता तिला नाशिकला घेऊन जात आहेत. जिथे तिला नाशिकच्या कोर्टासमोर हजर केले जाईल.

निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती

२५ मार्चपासून निदा खान होती फरार

नाशिकमधील TCS प्रकरण समोर आल्यापासून पोलीस निदा खानच्या शोधात होती. २५ मार्चपासून ती सातत्याने फरार होती. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने तिचा शोध सुरू ठेवला होता. आरोपी निदा खान वारंवार तिचे लोकेशन बदलत होती. जवळच्या नातेवाईकांनी तिला लपवण्यात मदत केली होती. त्यातच अंतरिम जामिनासाठी तिने प्रयत्न सुरू केला होता. परंतु कोर्टाने तिला दिलासा दिला नाही. २ मे २०२६ रोजी नाशिक कोर्टाने तिची याचिका फेटाळली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या शोध मोहिमेला आणखी वेग दिला. 

कोर्टात काय घडलं?

नाशिक रोड कोर्टात या प्रकरणाची सुनावणी महत्त्वाची मानली जाते. निदा खानच्या वकिलाकडून कोर्टात तिची बाजू मांडण्यात आली. २९ एप्रिलला इन कॅमेरा सुनावणी झाली होती. त्यावेळी एसआयटीकडून पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी तपास अधिकारी म्हणून कोर्टात बाजू मांडत निदा खानला अंतरिम जामीन देण्यास विरोध केला. आरोपीने पीडितेला विशिष्ट धार्मिक प्रथांकडे वळवण्याचा प्रयत्न केला, काही धार्मिक ॲप्स डाउनलोड करवून घेतले आणि अनेक लिंक्स पाठवल्या असं सरकारने न्यायालयात दावा केला. तपास यंत्रणा या प्रकरणातील कथित परदेशी संबंधांचीही चौकशी करत आहेत. कोर्टात मालेगाव आणि मलेशियाशी असलेल्या संबंधांचा उल्लेख करण्यात आला. सध्या डिजिटल रेकॉर्ड आणि संपर्कांचा तपास केला जात आहे. 

दरम्यान, निदा खानच्या अटकेनंतर नाशिकपासून छत्रपती संभाजी नगरपर्यंत खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर या प्रकरणावर चर्चा सुरू आहे. तिच्या अटकेनंतर समोर आलेल्या फोटोवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आरोपीच्या चौकशीतून अनेक नवीन तपशील समोर येऊ शकतात. तिला पळण्यासाठी  कोणी मदत केली, ती कोणाच्या संपर्कात होती आणि या नेटवर्कमध्ये इतर व्यक्तींचा सहभाग आहे का हे तपास यंत्रणा शोधण्याचा प्रयत्न करेल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nida Khan arrested in TCS case; first photo surfaces after arrest.

Web Summary : Nida Khan, the main accused in the TCS conversion case, has been arrested in Chhatrapati Sambhajinagar. She was hiding with relatives. Police are investigating her connections and who aided her evasion. Court hearings revealed alleged foreign links and religious conversion attempts.
टॅग्स :TCS Nashik CaseTCS नाशिक केसPoliceपोलिस