Marathi News: मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे भरकटले. मात्र पायलटने प्रसंगावधान राखत ते वळवून जुहू पवनहंस येथे त्याचे यशस्वी लँडिंग करण्यात केले. या घटनेत कुणालाही इजा झाली नसून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासहित हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत.
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
उपमुख्यमंत्री शिंदे हे आपल्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबातील लग्नकार्यासाठी मुंबईहून मुरबाड जाण्यासाठी निघाले होते. दुपारी ३.३० वाजता महालक्ष्मी रेसकोर्स येथील हेलिपॅड वरून मुरबाडला जाण्यासाठी त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केले. मात्र हेलिकॉप्टर जेमतेम ऐरोलीपर्यंत पोहोचताच समोरून येणारे वादळ पायलटने पहिले.
कोण कोण होते हेलिकॉप्टरमध्ये?
संभाव्य धोका ओळखून पायलटने वेळीच याबाबत शिंदे यांना अवगत केले. तसेच पुढे जाण्याऐवजी मागे वळावे लागेल, असेही सांगितले. त्यानंतर त्याने तत्काळ हे हेलिकॉप्टर मागे वळवण्याचा निर्णय घेतला. पुढील काही मिनिटात हे हेलिकॉप्टर जुहू येथील पवनहंस येथे यशस्वी लँड झाले.
यावेळी या हेलिकॉप्टरमध्ये शिंदे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, विशेष कार्य अधिकारी बालसिंह राजपूत, जनसंपर्क विभागाचे विशेष कार्य अधिकारी विनायक पात्रुडकर आणि सुरक्षा रक्षक तसेच विमान कंपनीचे प्रतिनिधी होते.
Web Summary : Deputy Chief Minister Eknath Shinde's helicopter was diverted due to a storm near Mumbai. The pilot skillfully landed at Juhu Pawan Hans, ensuring the safety of Shinde and all passengers. They were en route to a wedding in Murbad.
Web Summary : महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का हेलीकॉप्टर गुरुवार को तूफानी हवाओं के कारण भटक गया। पायलट ने कुशलता दिखाते हुए जुहू पवनहंस में सुरक्षित लैंडिंग कराई। शिंदे और हेलिकॉप्टर में सवार सभी लोग सुरक्षित हैं। वे मुरबाड में एक शादी समारोह में जा रहे थे।