Join us
Daily Top 2Weekly Top 5

JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 07:11 IST

मार्च २०२६ पासून मध्यपूर्वेतील तणावामुळे आखाती देशांशी होणारी आयात-निर्यात मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली होती. त्यामुळे दररोजची कंटेनर वाहतूक २३ हजार टीईयूवरून २० हजारांपर्यंत घसरली होती.

Marathi News:  उरण : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती ओसरल्यानंतर जेएनपीए बंदराचे कामकाज पुन्हा सुरळीत होत असून, बंदरातील पाचही कंटेनर टर्मिनल्स पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्याची माहिती जेएनपीएने दिली. सध्या दररोज सरासरी १० ते १२ कंटेनर जहाजे बंदरात दाखल होत असून, आयात-निर्यात मिळून सुमारे २२ हजार टीईयू कंटेनर मालाची हाताळणी होते.

Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग

मार्च २०२६ पासून मध्यपूर्वेतील तणावामुळे आखाती देशांशी होणारी आयात-निर्यात मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली होती. त्यामुळे दररोजची कंटेनर वाहतूक २३ हजार टीईयूवरून २० हजारांपर्यंत घसरली होती. मात्र, परिस्थिती सुधारल्यानंतर एनएसएफटी, एनएसआयसीटी, एनएसआयजीटी, बीएमसीटी आणि एपीएमटी या पाचही टर्मिनल्समधील कामकाज पुन्हा पूर्वपदावर येत आहे.

रस्ते, रेल्वे मार्गेही वाहतूक

जेएनपीएनुसार, सध्या दररोज सुमारे २० हजार टीईयू मालाची रस्तेमार्गे तर २ हजार टीईयू मालाची रेल्वेमार्गे वाहतूक होत आहे.

कंटेनर फ्रेट स्टेशन असोसिएशन ऑफ इंडिया आणि बृहन्मुंबई कस्टम ब्रोकर्स असोसिएशनने बंदरातील गर्दी आणि वाहतुकीच्या समस्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र, जेएनपीएने बंदरातील कामकाजावर कोणताही विपरीत परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

विलंब हाेण्यामागे चालकांची कमतरता

कंटेनर निकासीतील विलंबाचे कारण ट्रेलर्स आणि चालकांची अपुरी उपलब्धता असल्याचे सांगून सीएफएस आणि कस्टम ब्रोकर्सनी आवश्यक व्यवस्था करावी, असे आवाहनही जेएनपीएने केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : JNPA Port Back to Full Capacity After Mideast Tensions Ease

Web Summary : JNPA port operations normalize as Mideast tensions subside. All five terminals are fully operational, handling 22,000 TEU containers daily via road and rail. Trailer and driver shortages cause delays, JNPA urges CFS and brokers to take action.
टॅग्स :जेएनपीटी