रस्त्याने चालताना एखादी बॅग दिसली पाहिजे आणि त्यात पैसे असले पाहिजे, असा विचार अनेकांच्या मनात येतो. पैसा कुणाला नको वाटतो. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये रस्त्याच्या कडेला तीन बॅगा दिसल्या. त्या उघडण्यात आल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला, कारण या तीन बॅगमध्ये २ कोटी ८४ लाख रुपये इतके मूल्य असलेल्या ५०० रुपयांच्या नोटा होत्या. पण, पोलिसांनी जी माहिती दिली ती भ्रमनिरास करणारी आहे.
इंदूरमधील सांवेर-उज्जैन रोडवर गुरुवारी सकाळी तीन बॅगा पडलेल्या दिसल्या. बेवारस असलेल्या या बॅगा बघून शेतकरी घाबरला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. पण, जेव्हा या बॅगा उघडण्यात आल्या, त्यात ५०० रुपयांच्या नोटांच्या गड्ड्या होत्या.
खऱ्या नोटा किती?
रस्त्याच्या कडेला पडलेल्या बॅगा बघून शेतकऱ्याने पोलिसांना माहिती दिली होती. एका झाडाखाली या बॅगा ठेवण्यात आलेल्या होत्या.
पोलिसांनी सगळ्या बॅगा तपासल्या. त्यात पैसे असल्याचे दिसल्यानंतर नोटाच्या बंडलचीही तपासणी केली, त्यात वर खऱ्या नोटा आणि आतमध्ये बनावट नोटा आणि नोटांसारखे दिसणार कागद आढळून आले. समोर आलेल्या माहितीनुसार, २ कोटी ८३ इतके मूल्य असलेल्या या नोटांमध्ये फक्त ८४ नोटाच खऱ्या आहेत.
पोलिसांनी काय सांगितले?
२ कोटी मूल्य असलेल्या या नोटा कुठल्यातरी अवैध व्यवहारासाठी वापरल्या जाणार असाव्यात. त्याच पद्धतीने या बॅगा तयार करण्यात आलेल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी या परिसरात नाकाबंदी करून तपास सुरू केला आहे. महामार्गावर असलेले सीसीटीव्ही फुटेज, तसेच ज्या ठिकाणी बॅग ठेवल्या गेल्या होत्या तेथील फुटेजही मिळवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
Web Summary : Bags containing ₹2.83 crore were found in Indore. Surprisingly, only 84 notes were genuine; the rest were fake. Police suspect the notes were intended for illegal transactions and are investigating CCTV footage.
Web Summary : इंदौर में 2.83 करोड़ रुपये से भरे बैग मिले। हैरानी की बात है कि केवल 84 नोट ही असली थे; बाकी नकली थे। पुलिस को संदेह है कि नोट अवैध लेनदेन के लिए थे और सीसीटीवी फुटेज की जांच कर रही है।