Join us
Daily Top 2Weekly Top 5

HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 13:10 IST

एचडीएफसी बँकेनं (HDFC Bank) कर्जाच्या व्याजदरात मोठा बदल केला आहे. काही विशिष्ट कालावधीसाठी बँकेनं 'मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट्स'मध्ये बदल केलेत.

एचडीएफसीबँकेनं (HDFC Bank) कर्जाच्या व्याजदरात मोठा बदल केला आहे. काही विशिष्ट कालावधीसाठी बँकेनं 'मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट्स' (MCLR) मध्ये ५ बेसिस पॉइंट्स (bps) म्हणजेच ०.०५ टक्क्यांची कपात केली आहे. ज्यांचे कर्ज या व्यवस्थेशी जोडलेलं आहे, अशा कर्जदारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. दुसरीकडे, बँकेनं एका विशिष्ट कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये ५ bps ची वाढ देखील केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर ७ मे २०२६ पासून लागू झाले आहेत.

या बदलानंतर एचडीएफसी बँकेचे एमसीएलआर दर आता कर्जाच्या कालावधीनुसार ८.०५% ते ८.६०% दरम्यान आहेत. यापूर्वी हे दर ८.१०% ते ८.५५% च्या दरम्यान होते.

महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान

HDFC बँकेचे ताजे व्याजदर

बँकेनं ७ एप्रिल २०२६ रोजी केलेल्या शेवटच्या दरातील बदलाच्या तुलनेत काही विशिष्ट कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये बदल केले आहेत :

  • ओव्हरनाईट आणि एक महिना: या दरात ५ बेसिस पॉइंट्सची घट झाली असून तो ८.१०% वरून ८.०५% झाला आहे.
  • तीन महिने: हा दर ८.२०% वरून कमी होऊन ८.१५% वर आला आहे.
  • सहा महिने: एमसीएलआर दर ८.३५% वरून ८.३०% झाला आहे.
  • एक वर्ष आणि दोन वर्षे: या कालावधीसाठीचे दर अनुक्रमे ८.३५% आणि ८.४५% वर स्थिर आहेत.
  • तीन वर्षे: या कालावधीसाठीच्या दरात ५ बेसिस पॉइंट्सची वाढ झाली असून तो ८.५५% वरून ८.६०% झाला आहे.

MCLR म्हणजे काय?

MCLR (Marginal Cost of funds-based Lending Rate) हा तो किमान व्याजदर आहे जो एखाद्या वित्तीय संस्थेला विशिष्ट कर्जासाठी आकारणं आवश्यक असतं. हा दर कोणत्याही कर्जासाठी व्याजदराची किमान मर्यादा निश्चित करतो. जोपर्यंत आरबीआयकडून (RBI) निर्देश दिले जात नाहीत, तोपर्यंत कर्जदारांसाठी ही मर्यादा कायम राहते. आरबीआयनं २०१६ मध्ये एमसीएलआरची सुरुवात केली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : HDFC Bank Revises Loan Rates: Check the Latest Interest Rates

Web Summary : HDFC Bank has revised its MCLR, reducing rates for some tenures by 5 bps, effective May 7, 2026. Overnight and one-month rates decreased to 8.05%, while three-year rates increased to 8.60%. One and Two year rates remain unchanged.
टॅग्स :एचडीएफसीबँकपैसा