शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 13:04 IST

1 / 9
उन्हाळा आला की सतत लाइट जाण्याचं प्रमाण वाढतं. अगदी भर दुपारी आणि कधीकधी मध्यरात्रीही अचानक लाइट जाते.
2 / 9
ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना अचानक लाइट गेल्याने मोठी तारांबळ होते. पण, उन्हाळ्यातच लोडशेडिंग का होतं? याचं कारण माहितीये का?
3 / 9
उन्हाळा आला की अनेक भागांमध्ये लोडशेडिंगची समस्या वाढते. तापमान वाढल्यामुळे विजेची मागणी अचानक खूप वाढते आणि त्यामुळे वीज पुरवठ्यावर ताण येतो.
4 / 9
उन्हाळ्यात एसी, कूलर, फॅन, फ्रिज यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. वीजेचा वापर अचानक वाढल्याने अनेकदा मागणीपेक्षा पुरवठा कमी पडतो.
5 / 9
जास्त वीज वापरामुळे ट्रान्सफॉर्मर गरम होणे, फ्यूज उडणे किंवा वीजवाहिन्यांमध्ये बिघाड होण्याच्या घटना वाढतात. त्यामुळे काही भागात तात्पुरता वीजपुरवठा बंद केला जातो.
6 / 9
अनेक वेळा औद्योगिक क्षेत्रांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात जास्त वेळ लोडशेडिंगचा सामना करावा लागतो.
7 / 9
वीज यंत्रणेवर ताण कमी करण्यासाठी वीज वितरण कंपन्या काही भागांमध्ये ठराविक वेळेस वीजपुरवठा बंद ठेवतात. यालाच लोडशेडिंग म्हणतात.
8 / 9
काही वेळेस कोळशाचा तुटवडा, पाण्याची कमतरता किंवा तांत्रिक बिघाडांमुळे वीज निर्मिती कमी होते. त्यामुळे संपूर्ण गरज भागवणे कठीण होते. अशा वेळी वीज खंडित करणं हा पर्याय निवडला जातो.
9 / 9
त्यामुळे लोडशेडिंग कमी करण्यासाठी अनावश्यक वीजेचा वापर टाळा. याशिवाय सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासोबतच ऊर्जा बचत करणारी उपकरणे वापरा.
टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलSummerउन्हाळाelectricityवीज