बिहारमध्ये नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन २४ तास उलटत नाहीत तोच, सम्राट चौधरी सरकारसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. शिक्षक भरतीच्या चौथ्या टप्प्याची जाहिरात तात्काळ काढावी, या मागणीसाठी पाटण्यात हजारो उमेदवार रस्त्यावर उतरले. आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी आंदोलकांवर जोरदार लाठीमार केला, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.
विद्यार्थी नेता दिलीप कुमार यांच्या नेतृत्वाखाली १० हजारहून अधिक उमेदवार पाटणा कॉलेजपासून डाकबंगला चौकापर्यंत धडकले. सरकार केवळ 'TRE 3' ची प्रक्रिया ओढत आहे, असा आरोप करत उमेदवारांनी नवीन भरतीची जाहिरात तात्काळ काढण्याची मागणी केली. तसेच सरकारने रिक्त जागांची नेमकी संख्या जाहीर करावी आणि जाहिरातीची अंतिम तारीख स्पष्ट करावी. शिक्षक भरतीत बिहारमधील स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यासाठी 'डोमिसाइल नीती' कडकपणे लागू करण्याची मागणी केली.
डाकबंगला चौकात 'तणावपूर्ण' शांतता
आंदोलकांमुळे संपूर्ण पाटणा शहराचा वेग मंदावला आहे. डाकबंगला चौकात १० हजार उमेदवारांच्या गर्दीमुळे रुग्णवाहिका आणि शालेय बस वाहतुकीत अडकून पडल्या होत्या. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी वॉटर कॅनन आणि लाठीमाराचा वापर केला. "मंत्रिमंडळ विस्तारात व्यस्त असलेल्या सरकारला आमच्या ग्रंथालयात बसून अभ्यास करणाऱ्या तरुणांची पर्वा नाही," अशी संतप्त प्रतिक्रिया दिलीप कुमार यांनी दिली आहे.
प्रशासनाचे मौन आणि वाढता असंतोष
इतक्या मोठ्या प्रमाणावर निदर्शने होऊनही अद्याप शिक्षण विभाग किंवा नवनियुक्त मंत्र्यांकडून कोणतेही अधिकृत आश्वासन देण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट असून, जाहिरात प्रसिद्ध न झाल्यास हे आंदोलन 'अनिश्चितकालीन घेराव' मध्ये बदलण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Web Summary : Within 24 hours of the new Bihar government's swearing-in, teacher candidates protested in Patna demanding a new recruitment advertisement. Police responded with a lathi charge, injuring several students. Protesters are demanding immediate action on teacher vacancies and domicile priority.
Web Summary : बिहार में नई सरकार के शपथ लेने के 24 घंटे के भीतर, पटना में शिक्षक अभ्यर्थियों ने नई भर्ती विज्ञापन की मांग करते हुए विरोध प्रदर्शन किया। पुलिस ने लाठीचार्ज किया, जिसमें कई छात्र घायल हो गए। प्रदर्शनकारी शिक्षक रिक्तियों और डोमिसाइल प्राथमिकता पर तत्काल कार्रवाई की मांग कर रहे हैं।