अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून, जगातील अत्यंत महत्त्वाचा व्यापारी मार्ग असलेल्या होर्मुज सामुद्रधुनीमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. नासाच्या 'फर्म्स' सॅटेलाईटने या परिसरात अनेक ठिकाणी आग लागल्याचे संकेत दिले आहेत. याच युद्धभूमीमध्ये गेल्या १० आठवड्यांपासून हजारो भारतीय खलाशी अडकून पडले असून, त्यांच्या अन्नापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
भारतीय खलाशांची आर्त हाक: "आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत"
इराणी बंदरात अडकलेले भारतीय खलाशी अनीश यांनी आपली व्यथा मांडली आहे. "आम्ही येथे मिसाईल्सचा पाऊस आणि युद्धाचा भीषण काळ पाहिला आहे. आमची मानसिक स्थिती पूर्णपणे ढासळली आहे," असे त्यांनी सांगितले. अनेक खलाशांना पगार मिळालेला नाही, तर काही जण इराण-आर्मेनिया सीमा ओलांडून घरी परतण्यात यशस्वी झाले आहेत. मात्र, अद्यापही सुमारे २०,००० नाविक तेथेच अडकल्याची माहिती आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने दिली आहे.
खाद्यपदार्थांची टंचाई आणि जगण्याची धडपड
अनीश यांच्या सांगण्यानुसार, सध्या ते केवळ बटाटे, कांदा आणि रोट्या खाऊन दिवस काढत आहेत. मात्र, समुद्रात उभ्या असलेल्या अनेक जहाजांवर अन्न आणि पिण्याच्या पाण्याचा साठा संपत आला आहे. जर लवकर मदत पोहोचली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
UNSC मध्ये राजकारण: रशिया-चीन व्हिटो वापरण्याची शक्यता
होर्मुजमध्ये जहाजांना सुरक्षा देण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एक प्रस्ताव आणला आहे. अमेरिका आणि बहरीन या प्रस्तावाचे मुख्य समर्थक आहेत. मात्र, रशिया आणि चीन या प्रस्तावाला विरोध करण्याची दाट शक्यता आहे. या प्रस्तावात इराणवर निर्बंध लादण्याचे संकेत दिले असून, युद्धाला अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले नसल्याने रशिया-चीन 'व्हिटो' अधिकाराचा वापर करू शकतात.
Web Summary : Tensions escalate in the Hormuz Strait, a key trade route, with NASA indicating fires. Thousands of Indian sailors are stranded, facing food and water shortages. An Indian sailor described dire conditions amidst missile threats. A UN proposal to secure ships faces potential Russian and Chinese vetoes.
Web Summary : नासा के संकेतों के अनुसार, होर्मुज जलडमरूमध्य में तनाव बढ़ गया है और आग लग गई है। हजारों भारतीय नाविक फंसे हुए हैं, जो भोजन और पानी की कमी का सामना कर रहे हैं। एक भारतीय नाविक ने मिसाइल खतरों के बीच भयावह स्थिति का वर्णन किया। जहाजों को सुरक्षित करने के लिए एक संयुक्त राष्ट्र प्रस्ताव को रूसी और चीनी वीटो का सामना करना पड़ सकता है।