Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 15:25 IST

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी दिसून येत आहे. इंडियन बुलियन्स मार्केटमध्ये सोन्याचा दर पुन्हा एकदा १,५१,००० रुपयांच्या पार पोहोचला आहे.

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी दिसून येत आहे. इंडियन बुलियन्स मार्केटमध्ये सोन्याचा दर पुन्हा एकदा १,५१,००० रुपयांच्या पार पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम २,७८३ रुपयांची वाढ झाली. गुरुवारच्या तुलनेत चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदवण्यात आली.

२४ ते १४ कॅरेट सोन्याचे आजचे दर 

इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशनच्या अहवालानुसार, आज शुक्रवारी सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत.

२४ कॅरेट: १,५१,१४० रुपये प्रति १० ग्रॅम.
२३ कॅरेट: १,५०,५३५ रुपये प्रति १० ग्रॅम.
२२ कॅरेट: १,३८,४४४ रुपये प्रति १० ग्रॅम.
१८ कॅरेट: १,१३,३५५ रुपये प्रति १० ग्रॅम.
१४ कॅरेट: ८८,४१७ रुपये प्रति १० ग्रॅम.
विशेष म्हणजे, गुरुवारच्या तुलनेत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९७ रुपयांनी खाली आला आहे.

चांदीच्या दरात किती वाढ? 

ibjrates नुसार, चांदीचा दर २,५५,२०० रुपये प्रति किलो या पातळीवर पोहोचला आहे. गुरुवारी चांदीचा दर २,५१,३८५ रुपये प्रति किलो होता. म्हणजेच कालच्या तुलनेत चांदीच्या दरात प्रति किलो ३,८१५ रुपयांची वाढ झाली आहे.

एप्रिल महिन्यात सोनं २,७८३ रुपयांनी महागलं

४ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर १,४८,३५७ रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो आतापर्यंत २,७८३ रुपयांनी वाढला आहे. याच कालावधीत चांदीच्या किमतीत १०,९६३ रुपये प्रति किलोची वाढ झाली आहे. ४ एप्रिल रोजी बुलियन्स मार्केटमध्ये चांदीचा दर २,४४,२३७ रुपये प्रति किलो होता.

लग्नसराईमुळे वाढली मागणी

भारतात पुन्हा एकदा लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढली असून, किमती वाढण्याचं हे एक महत्त्वाचं कारण मानलं जात आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात कराराची शक्यता वाढली आहे. इराण अमेरिकेच्या प्रस्तावांवर विचार करत आहे. जर असा कोणताही करार झाला, तर ते जगासाठी चांगले संकेत असतील. यामुळे कच्च्या तेलाचे दर कमी होतील आणि जागतिक बाजारपेठेत स्थिरता आल्यामुळे विकास दरात वाढ होईल. या सर्वांचा सकारात्मक परिणाम सोन्याच्या किमतींवर दिसून येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold, Silver Prices Surge: Check Today's Latest Rates Now

Web Summary : Gold prices soar amidst wedding season, reaching ₹1,51,000 per 10 grams, a ₹2,783 increase this month. Silver also jumps, exceeding ₹2,55,200 per kilo, a ₹10,963 monthly rise, fueled by wedding demand and global factors.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा