Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 15:04 IST

बाजारात नकारात्मक वातावरण असतानाही या कंपनीच्या शेअर्सनी पहिल्याच दिवशी चांगली कामगिरी केली. शुक्रवारी बाजार उघडताच कंपनीचा शेअर २०० रुपयांच्या पार गेलाय.

डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्म 'किश्त' चालवणारी कंपनी वनईएमआय टेक्नॉलॉजी सोल्युशन्स (OneEMI Technology Solutions) ची शेअर बाजारात दणक्यात एन्ट्री झाली आहे. बाजारात नकारात्मक वातावरण असतानाही या कंपनीच्या शेअर्सनी पहिल्याच दिवशी चांगली कामगिरी केली. शुक्रवारी बाजार उघडताच कंपनीचा शेअर २०० रुपयांच्या पार गेलाय. या आयपीओला (IPO) ९ पटाहून अधिक प्रतिसाद मिळाला होता आणि ग्रे मार्केटमध्येही हे शेअर्स प्रीमियमसह ट्रेड करत होते.

१९१ रुपयांवर लिस्टिंग, त्यानंतर शेअर्समध्ये मोठी वाढ

वनईएमआय टेक्नॉलॉजी सोल्युशन्सचे शेअर्स बीएसईवर (BSE) मध्ये ११.७ टक्क्यांच्या नफ्यासह १९१ रुपयांवर लिस्ट झालेत. लिस्टिंगनंतर लगेचच शेअर्समध्ये अधिक उसळी येऊन ते BSE मध्ये २०५.६० रुपयांवर पोहोचले.

एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या

दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (NSE) कंपनीचे शेअर्स ११.११ टक्के प्रीमियमसह १९० रुपयांवर लिस्ट झाले. लिस्टिंगनंतर NSE वर हे शेअर्स सध्या २०८.०५ रुपयांवर व्यवहार करत आहेत. आयपीओमध्ये शेअरची किंमत १७१ रुपये निश्चित करण्यात आली होती. कंपनीच्या आयपीओचे अलॉटमेंट ६ मे २०२६ रोजी अंतिम झाले.

आयपीओला ९ पटाहून अधिक पसंती

कंपनीचा आयपीओ एकूण ९.९६ पट सबस्क्राइब झाला होता. विविध श्रेणींमधील प्रतिसाद खालीलप्रमाणे होता:

  • रिटेल इनव्हेस्टर्स: २.१३ पट
  • नॉन-इन्स्टिट्यूशनल इनव्हेस्टर्स (NII): ६.९१ पट
  • क्वॉलीफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB): २५.९७ पट
  • या आयपीओचा एकूण आकार ८५० कोटी रुपयांपर्यंत होता.

आयपीओचे इतर तपशील

वनईएमआय टेक्नॉलॉजी सोल्युशन्सचा आयपीओ गुंतवणुकीसाठी ३० एप्रिल २०२६ रोजी उघडला होता आणि ५ मे रोजी बंद झाला. सामान्य गुंतवणूकदारांना किमान १ लॉट आणि कमाल १३ लॉटसाठी बोली लावण्याची संधी होती.

  • लॉट साईज: ८७ शेअर्स
  • किमान गुंतवणूक: १४,८७७ रुपये
     

आयपीओपूर्वी कंपनीत प्रवर्तकांची भागीदारी ३२.३० टक्के होती, जी आता २३.३३ टक्के राहिली आहे. रणवीर सिंग आणि कृष्णन विश्वनाथन हे कंपनीचे प्रवर्तक आहेत.

कंपनीबद्दल माहिती

वनईएमआय टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेडची सुरुवात २०१६ मध्ये झाली. ही एक 'टेक्नोलॉजी-एनेबल्ड लेंडर' कंपनी आहे. ही कंपनी विविध गरजांसाठी आपल्या मोबाईल ॲप्लिकेशन्सच्या माध्यमातून डिजिटल लोन उपलब्ध करून देते.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : OneEMI Tech Soars on Debut: Share Price Exceeds ₹200

Web Summary : OneEMI Technology Solutions, operating digital lending platform 'Kist', debuted strongly. Despite a negative market, shares exceeded ₹200 on the first day. The IPO was oversubscribed nine times, listing at ₹191 on BSE and ₹190 on NSE, reaching ₹208.05. IPO price was ₹171.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा