शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: पुणे, पिंपरीत शिवसेनेचा महापौर झालाचं पाहिजे; घासून नव्हे तर ठासून येणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 15:46 IST

पुणे, पिंपरी - चिंचवड महापालिकांमध्ये भगवा फडकत नाही, याची खंत वाटते.

ठळक मुद्देप्रत्येकाने एक नगरसेवक निवडून आणला तरी पिंपरी - चिंचवड महापालिकेत शिवसेनेची सत्ता

पिंपरी : मुंबई - ठाण्याचा महापौर शिवसेनेचा असल्याचा अभिमान आहे. मुंबई - ठाण्यात शिवसेना वाढली, विस्तारली, फोफावली, अगदी दिल्लीच्या तख्तापर्यंत जाऊन पोहोचली. मात्र, पुणे, पिंपरी - चिंचवडमध्ये अस्तित्वासाठी संघर्ष करायला लागतोय, हे चित्र चांगले नाही. पक्ष कमी पडला, पक्ष बांधणी झाली नाही, असे म्हणणे योग्य नाही. येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे. त्यासाठी तयारीला लागा. भविष्यकाळ शिवसेनेचा आहे, असा कानमंत्र शिवसेना नेते, खासदार, पुणे विभागीय संपर्क नेते संजय राऊत यांनी दिला. प्रभाग दोनचा होणार की तीनचा याचा विचार करत बसू नका, घासून नव्हे तर ठासून निवडून येईल, असा आत्मविश्वास बाळगा, असेही त्यांनी सांगितले.    

शिवसेना नेते संजय राऊत  यांनी रविवारी  शिरुर लोकसभा आणि पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. 

खासदार संजय राऊत म्हणाले, पुणे, पिंपरी - चिंचवड महापालिकांमध्ये भगवा फडकत नाही, याची खंत वाटते. शिवसेनेचे खासदार - आमदार निवडून येतात, पण महापालिका निवडणुकीत फुगा फुटतो. मागील निवडणुकीत चारच्या पॅनेल होते म्हणून पराभव झाला असे म्हणणे योग्य नाही. आपला पाया ढेपाळला होता, संघटनात्मक बांधणी कमकुवत होती, हे मान्य करायला हवे. मागील निवडणुकीत झालेल्या चुका यंदा होता कामा नये. महाविकास आघाडी होईल का नाही, झाली तर काय, नाही झाली तर काय, या भानगडीत पडू नका. निवडणुका एकट्याच्या जीवावर लढायची सवय आपल्याला आहे. सगळया जागांवर स्वबळावर लढायची आपली तयारी आहे. मात्र, स्वाभिमान सोडून, भगव्या झेंड्याशी तडजोड करुन आघाडी होणार नाही. आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्याशिवाय, असे शिवसेनेचे धोरण आहे.

प्रत्येकाने एक नगरसेवक निवडून आणला तरी पिंपरी - चिंचवड महापालिकेत शिवसेनेची सत्ता

शिवसेना गेल्या पन्नास वर्षापासून समाजकारणात - राजकारणात आहे. शिवसेनेने अनेक स्थित्यंतरे पाहिली. तरुण - युवा पिढी जोडली गेल्याने नव्या उमेदीने, ताकदीने पक्षविस्तार झाला.पक्ष वाढीसाठी नवीन चेहेऱ्यांची गरज आहे. स्वत:चा विचार करताना पक्षाचाही विचार केला पाहिजे. पक्ष वाढला की सन्मान - प्रतिष्ठा आपोआप वाढते.मेळाव्याच्या व्यासपीठावर भरपूर पदाधिकारी बसले आहेत. प्रत्येकाने एक नगरसेवक निवडून आणला तरी पिंपरी - चिंचवड महापालिकेत शिवसेनेची सत्ता येईल, असा आशावादही खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.    

टॅग्स :PuneपुणेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस