शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

By संतोष कनमुसे | Updated: November 7, 2025 16:01 IST

Parth Pawar Land Scam Pune: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले.

Parth Pawar Land Scam Pune: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले.  अमीडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेलीजमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणी चौकशी सुरू असून आतापर्यंत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता एक मोठी माहिती समोर आली आहे. 

पार्थ पवार आणि  दिग्विजय पाटील यांनी अमेडिया कंपनीचे रजिस्ट्रेशन केले आहे. या कंपनीकडून  खाजगी एलएलपी आयटी कंपनी उभारली जाणार होती. यासाठी या कंपनीने जमिनिची खरेदी करणार होते. कंपनीच्या सहीचे अधिकार पार्थ पवार यांनी दिग्विजय पाटील यांना आधीच दिल्याची माहिती समोर आली आहे. सहीचे अधिकार दिग्विजय पाटील यांना देण्याचा २२ एप्रिल २०२५ ला प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाची प्रत समोर आली आहे. 

पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर

दरम्यान, या व्यवहाराचा दस्त दिग्विजय पाटील यांच्या सहीने झाला आहे. या दस्तामध्ये पार्थ पवार यांनी सहीचे अधिकार दिल्याची प्रत जोडण्यात आली आहे. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आणखी मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कारवाईचे आदेश दिले असून अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात तहसीलदार येवले यांना निलंबित करण्यात आले आहे.

 अवघ्या ५०० रुपयांत स्टॅम्पपेपरवर करार

 पुण्यातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटी रुपयांची महार वतनाची ४० एकर जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीला केवळ तीनशे कोटी रुपयांत देण्यात आली. हा व्यवहार केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर करण्यात आल्याचे समोर आले.

तीनशे कोटींच्या ४० एकर जमीन नोंदणी प्रकरणात सहा कोटी रुपयांचा सेस न घेतल्याबद्दल दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांचे राज्य सरकारने निलंबन केले आहे.  दरम्यान, या प्रकरणी फक्त अधिकाऱ्यांनाच बकरे बनवू नका. हिंमत असेल तर कारवाई उपमुख्यमंत्री अजित पवारांवर करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

मुंढवा येथील  १६.१९ हेक्टर भूखंड खरेदीचा व्यवहार २० मे रोजी झाला. अमेडिया इंटरप्रायझेस एलएलपीचे भागीदार दिग्विजय  पाटील यांनी ही खरेदी केली. खरेदीदारांनी लेटर ऑफ इंटेंट आयटी दर्शविले. त्यामुळे या व्यवहाराला मुद्रांक शुल्क लागले  नाही. मात्र, दुय्यम निबंधक तारू यांनी एक टक्का स्थानिक संस्था कर आणि एक टक्का मेट्रो कर (सेस) असे सुमारे सहा कोटी रुपयांचे मुद्रांक घेतले नाही. तारू यांच्यावर कारवाई करावी, अशी शिफारस प्रभारी नोंदणी महानिरीक्षक सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे केली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Parth Pawar Land Scam: Digvijay Patil held power of attorney.

Web Summary : Parth Pawar's company faces scrutiny over a Pune land deal. Digvijay Patil, holding power of attorney, executed the transaction. Investigation underway, involving suspended officials and raising questions about potential irregularities in the ₹300 crore deal for land valued at ₹1804 crore.
टॅग्स :parth pawarपार्थ पवारPuneपुणेAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस