शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नाही; फडणवीसांच्या बॅनरवरून रोहित पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 12:58 IST

फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात लावण्यात आले होते बॅनर. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी केली होती बॅनरबाजी.

ठळक मुद्देफडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात लावण्यात आले होते बॅनर.पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी केली होती बॅनरबाजी.

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. परंतु पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी करत एकमेकांना आव्हान दिलं होतं. पुणे शहर भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा 'विकासपुरुष' आणि नव्या पुण्याचे शिल्पकार असा उल्लेख असलेले फ्लेक्स अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. नंतर त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आणि अजित पवारांचा 'कारभारी लयभारी' असा बॅनर लावण्यात आला होता. देवेद्र फडणवीस यांच्या बॅनरवरून रोहित पवारांनी आता टोला लगावला आहे. 

"बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो. हे पुणे आहे. बॅनर लावणाऱ्यांनी जगाला ज्ञान द्यावं, पण पुणेकरांना ज्ञान देण्याच्या भानगडीत पडून हाताने हसू करून घेऊ नये," असं म्हणत रोहित पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करत फडणवीसांवर निशाणा साधला.  अमोल मिटकरींनीही केली होती टीका  पुण्यात सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देणारे बॅनरबाजी केली. तसेच त्यांचा पुण्याचे शिल्पकार असा उल्लेख करण्यात आला होता. याचवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसावर ट्विटद्वारे निशाणा साधला होता. त्यात त्यांनी आता कमाल झाली. चक्क पुण्याचे शिल्पकार.. मला वाटतं,यापेक्षा दुसरा मोठा जोक असू शकत नाही. धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त..अशा शब्दात निशाणा साधला होता.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारRohit Pawarरोहित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणे