अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मध्यपूर्वेतील युद्ध आणि जागतिक संबंधांवर मोठी विधाने केली आहेत. इराणकडून कतार, सौदी अरेबिया आणि यूएई सारख्या मित्रराष्ट्रांना लक्ष्य केले जाईल, अशी अपेक्षा नव्हती, असे ट्रम्प यांनी मान्य केले आहे.
ट्रम्प यांच्या मते, इराण संपूर्ण मध्यपूर्वेवर आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. "जर गेल्या वर्षी अमेरिकेने कठोर पावले उचलली नसती, तर इराणने आतापर्यंत अणू शस्त्रे तयार करून त्यांचा वापर शेजारील देशांविरुद्ध केला असता," असा दावा त्यांनी केला आहे.
इटलीसोबतच्या संबंधांत दुरावाइटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या इराण युद्धातील भूमिकेवर ट्रम्प यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. "इटलीची भूमिका नकारात्मक राहिली आहे. जे देश कठीण काळात अमेरिकेची साथ देत नाहीत, त्यांच्याशी संबंध पूर्वीसारखे राहू शकत नाहीत," अशा शब्दांत त्यांनी मेलोनी यांना सुनावले आहे. यावेळी त्यांनी नाटो देशांच्या खर्चावरूनही पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
चीनकडून इराणला शस्त्रपुरवठा नाही?सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांना पत्राद्वारे कळवले आहे की, चीन इराणला कोणताही शस्त्रपुरवठा करत नाहीये. अमेरिकन गुप्तचर संस्थांनी चीन इराणला 'एअर डिफेन्स सिस्टम' देत असल्याचा अहवाल दिला होता, त्यानंतर ट्रम्प यांनी जिनपिंग यांना पत्र लिहून आक्षेप नोंदवला होता. पुढील महिन्यात होणाऱ्या ट्रम्प-जिनपिंग भेटीवर इराण प्रकरणाचा कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Web Summary : Trump admits surprise at Iran's potential targeting of US allies. He claims his policies prevented Iran from acquiring nuclear weapons. He criticizes Italy's stance and says China denies arming Iran, despite US intelligence reports.
Web Summary : ट्रम्प ने माना कि ईरान द्वारा अमेरिकी सहयोगियों को निशाना बनाने की आशंका नहीं थी। उन्होंने दावा किया कि उनकी नीतियों ने ईरान को परमाणु हथियार प्राप्त करने से रोका। उन्होंने इटली की भूमिका की आलोचना की और कहा कि चीन ने ईरान को हथियार देने से इनकार किया है।