पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. सर्वच पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. जनतेला विविध प्रकारचे आवाहन करताना दसत आहेत. यातच, "तुम्ही निवडणुकीत ममता दीदींचा हिशोब करा, आम्ही बंगालमधील गुंडांना उलटे टांगून सरळ करण्याचे काम करू," असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला केले आहे. ते बुधवारी जलपाईगुडी येथे एका जनसभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर (TMC) जोरदार हल्ला चढवला.
अमित शाह यांनी भाषणाची सुरुवात 'पोइला बैसाख'च्या शुभेच्छा देऊन केली. जलपाईगुडी हे मोठे राजकीय केंद्र असून ममता बॅनर्जींना सत्तेतून बाहेर काढण्याची सुरुवात येथूनच करायची आहे, असे ते म्हणाले. "राजगंज आणि जलपाईगुडीमध्ये टीएमसीचे नेते व्यापारी आणि ट्रान्सपोर्टर्सकडून हप्ते घेतात. पुराच्या मदतीचे १०० कोटी रुपये ममतांच्या गुंडांनी फस्त केले. तुम्ही केवळ मतदानयंत्रावर कमळाचे बटन शोधा. या सिंडिकेट माफियांचा बंदोबस्त भाजपच करेल," असा विश्वासही यावेळी शाह यांनी जनतेला दिला.
शाह पुढे म्हणाले, ममता दीदींनी जलपाईगुडीच्या टिंबर आणि टुरिझममध्ये 'टियर्स' (अश्रू) चा 'टी' जोडला. घुसखोरांच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, "ममता बॅनर्जी कितीही विरोध करो, आम्ही बंगालमधून घुसखोरांना बाहेर काढणारच." दरम्यान, 'एक देश, एक कायदा' यावर भाष्य करताना त्यांनी चार लग्नांच्या परवानगीवरूनही निशाणा साधला. तसेच, बंगालमध्ये कुणालाही बाबरी मशीद बांधू दिली जाणार नाही, असेही ठणकावून सांगितले.
Web Summary : Amit Shah attacked Mamata Banerjee in West Bengal, promising to rectify goons. He alleged TMC leaders extorted businesses and misused flood relief funds. Shah vowed to remove infiltrators and prevent mosque construction, emphasizing BJP's commitment to law and order.
Web Summary : अमित शाह ने पश्चिम बंगाल में ममता बनर्जी पर हमला बोला और गुंडों को सुधारने का वादा किया। उन्होंने आरोप लगाया कि टीएमसी नेताओं ने व्यवसायों से उगाही की और बाढ़ राहत कोष का दुरुपयोग किया। शाह ने घुसपैठियों को हटाने और मस्जिद निर्माण को रोकने का संकल्प लिया।