Join us
Daily Top 2Weekly Top 5

MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा

Rohit Sharma Injury Update: रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. वाचा सविस्तर अपडेट.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 18:47 IST

Open in App

आयपीएल २०२६ मध्ये आधीच संकटात असलेल्या मुंबई इंडियन्सच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. टीमचा स्टार ओपनर रोहित शर्मा गुरुवारी, १६ एप्रिल रोजी पंजाब किंग्स विरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात खेळणार नाहीये. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या गेल्या सामन्यात फलंदाजी करताना रोहितला 'हॅमस्ट्रिंग'ची समस्या जाणवली होती, ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते.

आरसीबी विरुद्धच्या सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करताना सहाव्या षटकात रोहितला दुखापत झाली आणि तो 'रिटायर्ड हर्ट' होऊन बाहेर गेला. क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, रोहितच्या दुखापतीचे स्वरूप किती गंभीर आहे, याबाबत आज (१५ एप्रिल) संध्याकाळी होणाऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापन अधिकृत माहिती देईल.

मुंबईची स्थिती नाजूकमुंबई इंडियन्सने या हंगामात आतापर्यंत ४ पैकी ३ सामने गमावले आहेत. रोहित सध्या फॉर्मात असून त्याने ४ सामन्यात ४५.६६ च्या सरासरीने १३७ धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत अनुभवी रोहितचे संघाबाहेर असणे हार्दिक पांड्या आणि कंपनीसाठी चिंतेची बाब आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्स सध्या जबरदस्त फॉर्मात असून ४ सामन्यात ७ गुणांसह ते गुणतालिकेत वरच्या स्थानावर आहेत.

सामन्याचे तपशील:सामना: मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स (२४ वा सामना)

तारीख आणि वेळ: १६ एप्रिल २०२६, रात्री ७:३० वाजता

मैदान: वानखेडे स्टेडियम, मुंबई

English
हिंदी सारांश
Web Title : Big Blow to MI! Rohit Sharma Out of Punjab Match

Web Summary : Mumbai Indians face setback as Rohit Sharma misses Punjab Kings clash due to hamstring injury sustained during the RCB match. His absence is a concern for MI, who have lost three of four matches. Punjab Kings are in good form.
टॅग्स :आयपीएल २०२६रोहित शर्मामुंबई इंडियन्स