जगातील सर्वात महत्त्वाचा व्यापारी मार्ग असलेल्या होर्मुजच्या सामुद्रधुनीतून अमेरिकेने आपली नाकेबंदी उठवल्याची घोषणा केली आहे. अवघ्या ४८ तासांपूर्वी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १० हजार सैनिक तैनात करून हा मार्ग रोखला होता. मात्र, आता "होर्मुज सर्वांसाठी खुला झाला आहे," असे पोस्ट करत ट्रम्प यांनी सर्वांनाच चकित केले आहे. या निर्णयामागे चीनची भूमिका आणि समुद्रातील बदललेली समीकरणे कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
चीनसोबत 'ती' डील झाली अन् रस्ता खुला झाला!
नाकेबंदी उठवताना ट्रम्प यांनी चीनचा विशेष उल्लेख केला. ट्रम्प म्हणाले, "चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. चीनने इराणला शस्त्रे पुरवू नयेत, अशी माझी विनंती त्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे आता होर्मुज बंद ठेवण्याची गरज नाही." ट्रम्प यांनी मिश्किलपणे असेही म्हटले की, "जेव्हा मी चीनला जाईन, तेव्हा जिनपिंग मला मिठी मारतील."
अमेरिकेची नाकेबंदी फेल ठरली?
ट्रम्प यांनी जरी शांततेचा आव आणला असला, तरी प्रत्यक्षात अमेरिकेची ही नाकेबंदी अयशस्वी ठरल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये आहे. नाकेबंदीच्या पहिल्याच दिवशी जवळपास २० जहाजांनी अमेरिकन नौदलाला न जुमानता होर्मुजमधून प्रवास केला. यामध्ये सर्वाधिक जहाजे चीनची होती. जर अमेरिकेने ही जहाजे रोखली असती, तर चीनशी थेट युद्ध ओढवले असते. चीनने याआधीच अमेरिकेला सज्जड दम दिला होता.
ब्रिटन आणि फ्रान्सचा दबाव
केवळ चीनच नाही, तर अमेरिकेचे मित्र राष्ट्र असलेल्या ब्रिटन आणि फ्रान्सनेही या नाकेबंदीवर नाराजी व्यक्त केली होती. फ्रान्सचे म्हणणे होते की, "युद्धात सहभागी असलेले देश संपूर्ण जगाला वेठीस धरू शकत नाहीत." या देशांनी अमेरिकेच्या विरोधात एक व्यापक युती तयार करण्यास सुरुवात केली होती, ज्यामुळे ट्रम्प प्रशासनावर दबाव वाढला होता.
इस्लामाबाद बैठकीवर लक्ष
या आठवड्याच्या शेवटी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात महत्त्वाची 'पीस डील' चर्चा होणार आहे. जर, होर्मुजमध्ये अमेरिकेचा फज्जा उडाला असता, तर चर्चेच्या टेबलावर अमेरिकेची बाजू कमकुवत झाली असती. ही नाचक्की टाळण्यासाठी ट्रम्प यांनी वाटाघाटीपूर्वीच स्वतःहून पाऊल मागे घेतल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सोमवारी लागू झालेली ही नाकेबंदी बुधवारी रात्री पूर्णपणे हटवण्यात आली असून, आता जागतिक व्यापारासाठी हा मार्ग पुन्हा एकदा सुरळीत झाला आहे.
Web Summary : Trump lifted the Hormuz Strait blockade after 48 hours, citing a deal with China regarding Iran's arms supply. Analysts suggest the move avoids further conflict and strengthens the US position before peace talks.
Web Summary : ट्रम्प ने ईरान को हथियारों की आपूर्ति के संबंध में चीन के साथ एक समझौते का हवाला देते हुए 48 घंटों के बाद होर्मुज जलडमरूमध्य की नाकेबंदी हटा दी। विश्लेषकों का सुझाव है कि यह कदम आगे के संघर्ष से बचाता है और शांति वार्ता से पहले अमेरिकी स्थिति को मजबूत करता है।