तुम्ही रोज इंटरनेटवर काहीतरी सर्च करण्यासाठी गुगल क्रोम वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गुगल क्रोममधील काही गंभीर सुरक्षा त्रुटींमुळे तुमचा खासगी डेटा धोक्यात आला असून, हॅकर्स तुमच्या सिस्टमवर ताबा मिळवू शकतात, असा गंभीर इशारा भारत सरकारने दिला आहे.
कोणी दिला इशारा?
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 'इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम' (CERT-In) या संस्थेने ही चेतावनी जारी केली आहे. या एजन्सीने या समस्येला 'हाय सीव्हेरिटी' म्हणजेच अत्यंत गंभीर धोक्याच्या श्रेणीत ठेवले आहे.
नेमका धोका काय?
CERT-Inच्या अहवालानुसार, गुगल क्रोममध्ये अशा काही त्रुटी आढळल्या आहेत, ज्याचा फायदा घेऊन हॅकर्स तुमच्या संगणकात अनधिकृत प्रवेश मिळवू शकतात. हॅकर्स तुम्हाला एखाद्या संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यास किंवा धोकादायक वेबसाइट उघडण्यास भाग पाडतात. तुम्ही एकदा का त्या लिंकवर क्लिक केले की, तुमच्या कॉम्प्युटरचा कंट्रोल हॅकर्सकडे जाऊ शकतो. यामुळे तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड, बँकिंग डिटेल्स आणि इतर वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे.
कोणत्या युजर्सना जास्त धोका?
जर तुम्ही विंडोज, मॅक किंवा लिनक्सवर गुगल क्रोमचे जुने व्हर्जन वापरत असाल, तर तुम्ही हॅकर्सच्या निशाण्यावर आहात. विशेषतः जे लोक क्रोमचा वापर बँकिंग व्यवहार किंवा ऑफिसच्या कामासाठी करतात, त्यांच्यासाठी हा धोका अधिक मोठा आहे. वेब कंटेंट, मीडिया प्रोसेसिंग आणि बॅकग्राउंड सिस्टममध्ये या तांत्रिक त्रुटी असल्याचे समोर आले आहे.
स्वत:चा बचाव कसा करावा?
घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण गुगलने यावर उपाय म्हणून नवीन अपडेट जारी केले आहे. तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला तुमचे गुगल क्रोम ब्राउझर त्वरीत अपडेट करणे आवश्यक आहे.
क्रोम अपडेट करण्याची सोपी पद्धत:
- तुमच्या कॉम्प्युटरवर Google Chrome उघडा.
- उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
- त्यानंतर 'Settings'मध्ये जा आणि डाव्या बाजूला असलेल्या 'About Chrome' पर्यायावर क्लिक करा.
- येथे क्रोम आपोआप नवीन अपडेट चेक करेल आणि ते इन्स्टॉल होईल.
- अपडेट पूर्ण झाल्यावर 'Relaunch' बटणावर क्लिक करा.
तुमची थोडीशी सतर्कता तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि मानसिक त्रासापासून वाचवू शकते. त्यामुळे वेळ न घालवता आजच आपले ब्राउझर अपडेट करा!
Web Summary : A critical Google Chrome security flaw threatens user data. Hackers can exploit vulnerabilities to access systems, steal banking details, and passwords. Update Chrome immediately to protect against potential financial loss.
Web Summary : गूगल क्रोम में एक गंभीर सुरक्षा खामी से यूजर डेटा खतरे में है। हैकर्स सिस्टम तक पहुंचने, बैंकिंग विवरण और पासवर्ड चुराने के लिए कमजोरियों का फायदा उठा सकते हैं। संभावित वित्तीय नुकसान से बचने के लिए तुरंत क्रोम अपडेट करें।