होर्मुझ समुद्रधुनीतील अमेरिकन नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर, इराणच्या बाबतीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काहीसे नरम झाल्याचे दिसत आहेत. पाकिस्तानमधील चर्चेनंतर आता वॉशिंग्टन आणि तेहरानमध्ये सुरू असलेला युद्धविराम आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकते, असे वृत्त समोर येत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून अणु कार्यक्रम आणि समुद्री मार्गावरून वाढलेला तणाव कमी होईल, अशी आशा आहे.
चर्चेसाठी हे तीन मुद्दे महत्वाचे - 'एपी' वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही देशांमधील युद्धविराम वाढवण्यासंदर्भात मध्यस्थांच्या चर्चेत मोठी प्रगती झाली आहे. अमेरिका आणि इराणने युद्धविराम वाढवण्यासंदर्भात सहमतीही दर्शवली आहे. आता हे दोन्ही देश लवकरच पुन्हा चर्चा करू शकतात अशी आशा आहे. जर ही चर्चा पुढे सरकली, तर त्यात प्रामुख्याने तीन मुद्दे असतील: पहिला म्हणजे इराणचा परमाणु कार्यक्रम, दुसरा स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील परिस्थिती आणि तिसरा मुद्दा युद्धातील नुकसानीचा मोबदला.
ट्रम्प यांचं शी जिनपिंग यांना पत्र -राष्टाध्यक्ष ट्रम्प यांनी अलीकडेच इराणच्या मुद्द्यावर चीनशी चर्चा केली. ते म्हणाले, "मी शी जिनपिंग यांना पत्र लिहून इराणला शस्त्रास्त्रे न पुरविण्याची विनंती केली. त्यांनीही मला पत्र लिहून आपण असे करत नसल्याचे म्हटले आहे."
इराणने सॅटेलाइटच्या मदतीनं केले अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! -फायनान्शिअल टाइम्स'च्या वृत्तानुसार, इराणने चीनच्या 'अर्थ आय' कंपनीने विकसित केलेल्या TEE-01B सॅटेलाईट्सच्या सेवा खरेदी केल्या होत्या. हे सॅटेलाईट्स लाँच झाल्यानंतर काही दिवसांतच इराणी लष्कराच्या एरोस्पेस फोर्सने त्यांचा वापर केला. या उपग्रहांच्या मदतीने इराणने अमेरिकन लष्करी ठिकानांचे मॉनिटरिंग केले. यानंतर, सॅटेलाइटच्या सहाय्याने फोटोज आणि इतर महिती मिळवली होती. अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने या माहितीचा वापर करून इराक, कतर आणि सौदी अरेबियातील आदी ठिकाणच्या अमेरिकन तळांवर जोरदार मिसाइल हल्ले चढवले.
चीनने वृत्त फेटाळले -दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. चीनवर अतिरिक्त टॅरिफ (कर) लावण्यासाठी हे सर्व रचलेले कारस्थान असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी म्हटले आहे.
Web Summary : Amidst tensions, a US-Iran ceasefire extension is likely, potentially easing conflict. Key discussion points include Iran's nuclear program, the Strait of Hormuz situation, and war reparations. Trump sought China's cooperation on Iran arms.
Web Summary : तनाव के बीच, अमेरिका-ईरान युद्धविराम बढ़ने की संभावना है, जिससे संघर्ष कम हो सकता है। मुख्य चर्चा बिंदुओं में ईरान का परमाणु कार्यक्रम, होर्मुज जलडमरूमध्य की स्थिति और युद्ध क्षतिपूर्ति शामिल हैं। ट्रंप ने ईरान हथियारों पर चीन का सहयोग मांगा।