Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं

RCB च्या ताफ्यात याआधी असं चित्र कधीच नाही दिसलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 19:26 IST

Open in App

First Time Ever Virat Kohli Will Play As An Impact Player IPL : आयपीएल २०२६ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात यंदाच्या हंगामातील २३ वा सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. घरच्या मैदानात नाणेफेक जिंकून रजत पाटीदार याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोश हेजलवूड या सामन्यातून पुन्हा एकदा कमबॅक करत आहे. याशिवाय RCB च्या संघाकडून पहिल्यांदाच विराट कोहली इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात खेळताना दिसणार आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग इलेव्हन 

फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक फलंदाज, टिम डेविड, रोमारियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड, सुयश शर्मा, रसिक सलाम दार.

 

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इम्पॅक्ट प्लेयर्स- विराट कोहली, व्यंकटेश अय्यर, जॉर्डन कॉक्स, कनिष्क चौहान, मंगेश यादव

 लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन एडन मार्करम, मिचेल मार्श, रिषभ पंत (यष्टीरक्षक फलंदाज/ कर्णधार), निकोलस पूरन, आयुष बडोनी, अब्दुल समद, मुकुल चौधरी, मोहम्मद शमी, आवेश खान, दिग्वेश सिंग राठी, प्रिन्स यादव.

  • लखनौ सुपर जायंट्स इम्पॅक्ट प्लेयर्स: मणिमरन सिद्धार्थ, जॉर्ज लिंडे, मॅथ्यू ब्रेट्झके, हिम्मत सिंग, मयंक यादव

 

English
हिंदी सारांश
Web Title : Rishabh Pant's LSG's game plan; Kohli to bat only for RCB?

Web Summary : RCB chose to bowl first after winning the toss. Kohli played as impact player. LSG and RCB's playing elevens are listed.
टॅग्स :आयपीएल २०२६रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरलखनौ सुपर जायंट्सरिषभ पंतविराट कोहली