भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळीच्या प्रकृतीबाबत अत्यंत भीतीदायक वृत्त समोर आले आहे. कांबळीच्या एका जवळच्या मित्राने खुलासा केला आहे की, विनोदच्या मेंदूत रक्ताची गाठ आढळली असून त्याला कोणत्याही क्षणी 'ब्रेन स्ट्रोक' येण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
काही दिवसांपूर्वी विनोद कांबळीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याला नीट चालताही येत नव्हते. त्यानंतर झालेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्याच्या मेंदूत रक्ताची गाठ असल्याचे निदान झाले आहे. या गाठीमुळे त्याच्या शरीराच्या हालचालींवर आणि स्मरणशक्तीवर गंभीर परिणाम झाला आहे. डॉक्टरांच्या मते, ही स्थिती अत्यंत नाजूक असून रक्ताच्या गुठळीमुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित होऊ शकतो, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढला आहे.
आर्थिक विवंचना आणि एकाकी लढासचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र असलेल्या कांबळीची ही अवस्था पाहून क्रिकेट चाहते हळहळत आहेत. खेळाडू म्हणून अमाप प्रसिद्धी मिळवल्यानंतर आता तो गंभीर आजार आणि आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळीला सध्या तातडीच्या आणि महागड्या उपचारांची गरज आहे. मैदानावर गोलंदाजांना घाम फोडणारा हा 'डाव्या हाताचा फलंदाज' आज आयुष्याच्या खेळपट्टीवर मृत्यूशी झुंज देत आहे.
Web Summary : Ex-cricketer Vinod Kambli faces a serious health crisis. A friend revealed he has a blood clot in his brain, posing a high risk of stroke, impacting movement and memory. Facing financial struggles, Kambli needs urgent treatment, battling for his life.
Web Summary : पूर्व क्रिकेटर विनोद कांबली गंभीर स्वास्थ्य संकट का सामना कर रहे हैं। एक मित्र ने खुलासा किया कि उनके मस्तिष्क में खून का थक्का है, जिससे स्ट्रोक का खतरा बढ़ गया है, जो आंदोलन और स्मृति को प्रभावित कर रहा है। आर्थिक तंगी से जूझ रहे कांबली को तत्काल इलाज की जरूरत है, जो अपने जीवन के लिए संघर्ष कर रहे हैं।