IPL 2026 RCB vs LSG Rishabh Pant Retired Hurt Due To Injury : बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौ सुपर जाएंट्सची सुरुवात खराब झाली. एडन मार्करमच्या रुपात पहिली विकेट गमावल्यावर रिषभ पंत मैदानात उतरला. पण जोश हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर दुखापत झाल्यामुळे वेदनेनं व्याकूळ होऊन LSG च्या कर्णधारावर मैदान सोडण्याची वेळ आली. लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाला हा एक मोठा धक्काच आहे.
नेमकं काय घडलं? त्याची दुखापत किती गंभीर?
नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना धावफलकावर ३२ धावा असताना लखनौच्या संघाला पहिला धक्का बसला. एडन मार्करमची जागा घेण्यासाठी रिषभ पंत मैदानात उतरला. पाचव्या षटकात फक्त तीन चेंडू खेळवल्यावर त्याने वेदनेनं व्याकूळ होऊन खातेही न उघडता मैदान सोडलं. जोश हेजलवूडनं टाकलेल्या आखुड टप्प्याच्या चेंडूवर रिषभ पंतने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंडू थेट त्याच्या डाव्या कोपरावर (left elbow) लागला. चेंडू लागल्यावर पंतला वेदना असह्य झाल्याचे पाहायला मिळाले. फिजिओ मैदान आले अन् त्याला पॅव्हेलियनच्या दिशेनं घेऊन गेले. आधीच आघाडीच्या फळीतील स्टार फलंदाज धावांसाठी संघर्ष करत आहेत. त्यात पंतला दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतण्याची वेळ आली. त्याची दुखापत किती गंभीर आहे ते अजून गुलदस्त्यातच आहे.
Web Summary : During the RCB vs LSG match, Rishabh Pant sustained an injury to his left elbow after being hit by a Hazlewood delivery. Visibly in pain, the LSG captain retired hurt, a significant blow to the team. The severity of his injury remains unknown.
Web Summary : आरसीबी बनाम एलएसजी मैच के दौरान, रिषभ पंत को हेज़लवुड की गेंद लगने से बाएं कोहनी में चोट आई। दर्द से कराहते हुए, एलएसजी कप्तान रिटायर्ड हर्ट हो गए, जो टीम के लिए एक बड़ा झटका है। उनकी चोट की गंभीरता अभी भी अज्ञात है।