15 Apr, 26 12:44 PM
अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथून एक संतापजनक 'व्हिडीओकांड' समोर आले आहे. एका १९ वर्षीय तरुणाने अनेक तरुणींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडीओ व अनेक आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली आहे. दरम्यान, आता आरोपी अयान याच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे.
15 Apr, 26 12:14 PM
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
पंजाबमधील फतेहगड साहिब जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. भाविकांनी भरलेली एक बस अचानक अनियंत्रित होऊन उलटली. या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २५ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर
15 Apr, 26 11:30 AM
भगवंत मान यांचा निशाणा
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे (AAP) नेते आणि राज्यसभेतील उपनेते अशोक मित्तल यांचं घर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. या कारवाईनंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याप्रकरणी भाजपावर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर मान यांनी लिहिलं की, "भाजपाद्वारे पंजाब निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांचं घर आणि युनिव्हर्सिटीमध्ये ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल आहे." वाचा सविस्तर
15 Apr, 26 11:08 AM
बिहारमध्ये २४ वे मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरींनी घेतली शपथ
सम्राट चौधरी हे बिहारचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत. सम्राट चौधरी यांनी बुधवारी बिहार लोक भवनात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यासह, बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री असण्याची ही पहिलीच वेळ आहे. माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी राजीनामा दिला.
15 Apr, 26 10:06 AM
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार?
केंद्र सरकारने लोकसभेची सदस्यसंख्या सध्याच्या ५४३ वरून थेट ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ‘संविधान (१३१ वी सुधारणा) विधेयक, २०२६’द्वारे हा बदल सुचवण्यात आला असून, महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.