By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 10:38 IST
1 / 8Gold Silver Rate Today: १५ एप्रिल रोजी 'मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया' (MCX) वर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये वेगवेगळे बदल पाहायला मिळत आहेत. आज सोन्याच्या किमतीत किरकोळ घसरण झाली असताना, चांदीच्या दरात मात्र वाढ नोंदवण्यात आली आहे. 2 / 8बुधवारी देशांतर्गत कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याचा भाव १,५४,७६६ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,५५,१५६ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. दरम्यान, जागतिक कमोडिटी मार्केट 'कॉमेक्स' (Comex) वर आज सकाळी सुरुवातीला सोने आणि चांदीमध्ये मोठी तेजी दिसून येत होती.3 / 8२९ जानेवारी रोजी सोने आणि चांदीच्या किमतींनी आपला ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव १,८०,००० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव ४,२०,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. आपल्या या ऐतिहासिक विक्रमी पातळीपासून सोनं आता केवळ २५,२३४ रुपयांनी स्वस्त राहिलं आहे, तर चांदी १,६४,८४४ रुपयांनी खाली आहे.4 / 8MCX वर मागील सत्रात सोन्याची किंमत १,५४,८६८ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीची किंमत २,५२,४९९ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. मागील बंद भावाच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत घसरण आणि चांदीत वाढ झाली आहे.5 / 8दिल्ली: २४ कॅरेट सोन्याची किंमत १,५४,०९० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. २२ कॅरेटसाठी १,४१,२६० रुपये आणि १८ कॅरेटसाठी १,१५,६१० रुपये मोजावे लागत आहेत. चांदीचा भाव २,५४,९०० रुपये प्रति किलो आहे.6 / 8मुंबई: २४ कॅरेट सोन्याचा दर १,५३,९४० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेटसाठी १,४१,११० रुपये आणि १८ कॅरेटसाठी १,१५,४६० रुपये आहे. चांदीचा दर येथेही २,५४,९०० रुपये प्रति किलोवर आहे.7 / 8चेन्नई: आज येथे २४ कॅरेट सोन्याची किंमत १,५५,१४० रुपये, २२ कॅरेटसाठी १,४२,२१० रुपये आणि १८ कॅरेटसाठी १,१८,६६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. चांदीची किंमत २,६५,१०० रुपये प्रति किलोवर पोहोचलीये.8 / 8कोलकाता: २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५३,९४० रुपये, २२ कॅरेटसाठी १,४१,११० रुपये आणि १८ कॅरेटसाठी १,१५,४६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. चांदीचा भाव २,५४,९०० रुपये प्रति किलो आहे.