शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 12:13 IST

Rohit Pawar In Baramati Bypoll Election 2026: बारामतीकरांना फार सांगायची गरज नाही, त्यांना काय करायचे हे माहित असते, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

Rohit Pawar In Baramati Bypoll Election 2026: सुनेत्रा काकींच्या विरोधात उभे राहिलेले २२ लोक आहेत, त्यांना प्रत्येकाला एखादे दुसरे मत मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. बाहेरून आलेले लोक आहेत, त्यांना शून्य मतदानही होऊ शकते. जेवढे मतदान जास्त होईल तेवढे सर्व मतदान ९९ टक्के सुनेत्रा काकींना होईल. मतदान होईल त्यातील ९९ टक्के मतदान अजितदादांच्या पक्षाला होईल, ते दादांकडे बघून होईल, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

बारामती पोटनिवडणुकीसाठी रोहित पवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. रोहित पवार म्हणाले की, सर्वजण आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहेत. २३ तारखेला मतदान आहे, त्यामुळे दिवस कमी आहेत. वेगवेगळ्या भागात प्रचार केला तर व्याप्ती वाढते. त्यांचा वेगळ्या बाजूचा प्रचार सुरू आहे, आमचा दुसऱ्या बाजूचा प्रचार सुरू आहे. परिवारातील इतरही लोक आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहेत, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. 

सुनेत्रा पवार यांना लीड कशी मिळेल यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न

अजितदादांच्या प्रति असणारा आदर आणि प्रेम यासाठी लोक प्रचार करत आहेत. भावनिक नाते सोडले तर मला असे वाटते की दुसरा कुठलाही विषय नाही. अजितदादांनी अनेक लोकांना राजकारणात येण्यासाठी मदत केलेली आहे, सामाजिक दृष्टिकोन ठेवून मदत केली आहे, व्यक्तिगत मदत केली आहे. दादांकडे बघून कर्तव्य म्हणून आपण या ठिकाणी फिरत असतो. अजितदादांच्या निधनानंतर निवडणुकीच्या प्रचारासाठी इथे यावे लागत आहे, हे दुर्दैव आहे. या ठिकाणातून सुनेत्रा पवार यांना लीड कशी मिळेल यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत आहे, असे रोहित पवार म्हणाले. 

दरम्यान, अजितदादा गेल्यानंतर बारामतीची पोटनिवडणूक होत आहे, काकी सुनेत्रा पवार उभे आहेत. बारामतीकरांना फार सांगायची गरज नाही, त्यांना काय करायचे हे माहित असते. अजितदादांच्या कार्याकडे बघून शंभर टक्के मतदान प्रत्येक गावातून सुनेत्रा पवार यांना व्हावे ही विनंती करत आहे, असे आवाहन रोहित पवारांनी केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Pawar campaigns for Sunetra Pawar, invokes Ajit Dada's name.

Web Summary : Rohit Pawar urged Baramati voters to support Sunetra Pawar in the upcoming by-election, emphasizing Ajit Dada's legacy and contributions. He anticipates a landslide victory for Sunetra, fueled by respect for Ajit Dada.
टॅग्स :BaramatiबारामतीRohit Pawarरोहित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवार