इलेक्ट्रिक कारच्या जगात आता केवळ रेंज आणि डिझाइनच नाही, तर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही विशेष भर दिला जात आहे. चीनमधील ऑटोमोबाईल कंपनी 'चांगन'ने (Changan) आपल्या 'नेवो' (Nevo) ब्रँड अंतर्गत 'Nevo Q06' ही नवी मिड-साईज इलेक्ट्रिक SUV सादर केली आहे. या कारची एवढी चर्चा होण्याचे कारण म्हणजे, तिचे प्रगत सेफ्टी फीचर्स, ज्यामुळे टायर फुटण्यासारख्या भीषण परिस्थितीतही कारवरील नियंत्रण सुटू देत नाहीत.
अशी आहे नवी इलेक्ट्रिक SUV -ही कार पूर्णपणे इलेक्ट्रिक (EV) आणि EREV (Extended Range Electric Vehicle) अशा दोन प्रकारांत उपलब्ध असेल. EV व्हर्जन बॅटरीवर चालते, तर EREV मध्ये एक छोटे पेट्रोल इंजिन बॅटरी चार्ज करण्यासाठी दिले जाते, यामुळे लांबचा प्रवास सोपा होतो. या गाडीचा टॉप स्पीड २०० ते २३० किमी प्रति तास एवढा आहे.
भन्नाट सेफ्टी फीचर्स -या कारचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, तिचे सेफ्टी फीचर्स. यात एक अप्रतिम 'ड्राईव्ह सिस्टिम' देण्यात आली आहे. जी रस्त्यावर वाहनाचा समतोल राखते. महत्वाचे म्हणजे, प्रवासादरम्यान अचानक टायर फाटल्यास अथवा फुटल्यास, ही सिस्टिम कारला नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणावर टळतो.
याशिवाय, यात नवीन सोडियम-आयन बॅटरी तंत्रज्ञान वापरले जाऊ शकते, जे कडाक्याच्या थंडीतही उत्तम परफॉर्मन्स देते आणि बॅटरी चार्जिंगही जलद होते.
१४ विविध प्रकारचे व्हील डिझाइन्स -विशेष म्हणजे, ग्राहकांसाठी कंपनीने १४ विविध प्रकारचे व्हील डिझाइन्स, पॅनोरमिक सनरूफ, LiDAR सेन्सर आणि प्रायव्हसी ग्लास असे कस्टमायझेशन पर्याय दिले आहेत. ही कार भारतात कधी लाँच होईल याबाबत अद्याप स्पष्टता नसली, तरी भविष्यातील सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने ही कार म्हणजे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे.
Web Summary : Changan's Nevo Q06 electric SUV boasts advanced safety features, preventing loss of control during tire bursts. Available in EV and EREV versions, it offers high speed, sodium-ion battery technology, and customization options. Launch in India is yet to be confirmed.
Web Summary : चांगन की नेवो क्यू06 इलेक्ट्रिक एसयूवी में उन्नत सुरक्षा विशेषताएं हैं, जो टायर फटने के दौरान नियंत्रण खोने से रोकती हैं। ईवी और ईआरईवी संस्करणों में उपलब्ध, यह उच्च गति, सोडियम-आयन बैटरी तकनीक और अनुकूलन विकल्प प्रदान करता है। भारत में लॉन्च की पुष्टि होनी बाकी है।