शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 14:56 IST

Aaditya Thackeray in Shiv Sena UBT: आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर केला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Aaditya Thackeray in Shiv Sena UBT: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध गोष्टींची चर्चा सुरू आहे. याचदरम्यान, उद्धवसेनेसंदर्भात एक बातमी आली आहे. जून महिन्यात होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांना पक्षात मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर केला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खासदार संजय राऊत यांनीही याबाबत पत्रकार परिषदेत उत्तर दिल्याने ही चर्चा अधिकच तीव्र झाली आहे. पण आता या विषयावर खुद्द आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे.

आदित्य ठाकरे हे उद्धवसेनेचे वरच्या फळीतील नेते आहेत. उद्धव ठाकरे यांचा आमदार म्हणून विधान परिषदेतील कार्यकाळ नुकताच संपला. आता पुन्हा उद्धव ठाकरे आमदारकी लढवणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण याच दरम्यान महाराष्ट्रात राजकारणात उद्धवसेनेत नेतृत्वबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच अनुषंगाने आदित्य ठाकरे यांना पक्षाचे कार्याध्यक्षपद दिले जाऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. पण आदित्य ठाकरे यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. "आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे. ह्या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही. कृपया ह्याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी," अशी एक्स पोस्ट करत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

संजय राऊत आदित्य ठाकरेंबाबत काय म्हणाले?

"(आदित्य ठाकरेंबाबत) मला मीडियातून ही माहिती समजली. हे जे निर्णय असतात, ते पक्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात. उद्धव ठाकरे कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते. आदित्य ठाकरे यांचे नाव समोर आले असेल तर स्वागत केले पाहिजे. मीडियातील माहितीवर हे बोलत आहे. अजून तरी असे काही ठरलेले नाही. तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. पुढचे राजकारण तरुणाच्या हातात गेले पाहिजे. खासगीमध्ये बोलण्याला अर्थ नसतो. पक्षाच्या संघटनेत चर्चा होत असते. मुंबई महापालिका किंवा इतर महापालिकांच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी उत्तम काम केले आहे. त्यांच्या तरुणांच्या टीमने उत्तम काम केले आहे," असे संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.

दरम्यान, ठाकरे गटाची महत्त्वाची कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला जाईल आणि तो मंजूर केला जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच निष्ठावंत युवा कार्यकर्त्यांना अधिक संधी मिळू शकते. संघटनेत फेरबदल केले जाऊ शकतात. संघटना अधिक बळकट करण्यासाठी बूथ स्तरावर आणि जिल्हा स्तरावर काही मोठे फेरबदल होतील, असेही म्हटले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Aaditya Thackeray denies reports of new party position amid speculation.

Web Summary : Amidst speculation about his promotion, Aaditya Thackeray clarified that reports of him receiving a new position in Shiv Sena UBT are baseless. Sanjay Raut suggested considering Thackeray for leadership, but Aaditya dismissed the rumors via social media.
टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना