RailTel Corporation of India: भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठी हालचाल पाहायला मिळत आहे, जिथे 'रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'च्या (RailTel) शेअर्सनी गुंतवणूकदारांना चकित केलंय. कंपनीला मिळालेल्या मोठ्या कंत्राटांमुळे शेअरच्या किमतीत सुमारे १२% ची जोरदार वाढ झाली. रेलटेलला नुकतीच ६०८ कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली असून, यामुळे बाजारात उत्साहाचं वातावरण आहे.
मोठ्या ऑर्डर्समुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला
रेलटेलला एकूण ६०८ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे ३ मोठे प्रकल्प मिळालेत. यापैकी ५६४.५४ कोटी रुपयांची सर्वात मोठी ऑर्डर 'रेल विकास निगम लिमिटेड'कडून (RVNL) मिळाली आहे. हे काम टनल कम्युनिकेशन सिस्टमशी संबंधित असून यामध्ये पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वित करणं अशा महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
याव्यतिरिक्त, कंपनीला उत्तर प्रदेश पोलीस रिक्रुटमेंट अँड प्रमोशन बोर्डाकडून ४३.९६ कोटी रुपयांची दुसरी ऑर्डर मिळाली आहे. यामध्ये भरती परीक्षांदरम्यान सुरक्षाविषयक कामं करायची आहेत. या मोठ्या ऑर्डर्समुळे कंपनीचा महसूल आणि 'ऑर्डर बुक' मजबूत होण्याची शक्यता असल्यानं गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. याच कारणामुळे बाजार उघडताच शेअरमध्ये मोठी खरेदी झाली आणि किंमत ३१६ रुपयांपर्यंत पोहोचली. दरम्यान, नवोदय विद्यालय समितीकडून मिळालेली १७.१२ कोटी रुपयांची एक ऑर्डर रद्द झाली असली तरी, त्याचा एकूण कामगिरीवर फारसा परिणाम झालेला नाही.
रेलटेलच्या शेअरची कामगिरी आणि मार्केट कॅप
रेलटेलच्या शेअरच्या मागील कामगिरीवर नजर टाकल्यास, हा स्टॉक अजूनही त्याच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून (४७८.८० रुपये) सुमारे ४०% खाली आहे, तर नीच्चांकी पातळीवरून १६% वर आहे. याचा अर्थ स्टॉकमध्ये अजूनही रिकव्हरीला वाव आहे. कंपनीचं मार्केट कॅप सुमारे ९,१२९ कोटी रुपये असून ती 'मिडकॅप' श्रेणीत येते.
एकाच दिवसात १२% पेक्षा जास्त उसळी
१५ एप्रिल २०२६ रोजी रेलटेलच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. स्टॉक १२% पेक्षा जास्त उसळीनंतर ३१८.९० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. गेल्या काही काळापासून दबावाखाली असलेला हा शेअर आता सावरण्याचे संकेत देत आहे. मोठ्या ऑर्डर्स कंपनीच्या वाढीसाठी सकारात्मक मानल्या जातात. मात्र, अशा तेजीनंतर थोडी नफा वसुलीदेखील होऊ शकते, त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजाराची चाल आणि कंपनीच्या मूलभूत गोष्टींवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : RailTel shares surged 12% after securing ₹608 crore in orders, including a major project from RVNL. Investor confidence rose due to these significant contracts, driving the stock price up despite a cancelled order. The company's market cap is ₹9,129 crore.
Web Summary : ₹608 करोड़ के ऑर्डर मिलने के बाद रेलटेल के शेयर 12% चढ़े, जिसमें RVNL से एक बड़ी परियोजना शामिल है। इन महत्वपूर्ण अनुबंधों के कारण निवेशकों का विश्वास बढ़ा, जिससे रद्द किए गए ऑर्डर के बावजूद शेयर की कीमत बढ़ गई। कंपनी का मार्केट कैप ₹9,129 करोड़ है।