शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 14:13 IST

होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या पाकिस्तानच्या दोन जहाजांना अमेरिकन सैन्याने रोखले.

एकीकडे इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव निवळण्यासाठी शांतीदूत बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेने मोठा झटका दिला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या पाकिस्तानच्या दोन जहाजांना अमेरिकन नौदलाने रोखून त्यांना परत जाण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे, याच मार्गावरून चीनसह इतर देशांची २० जहाजे विनासायास जात असताना केवळ पाकिस्तानलाच लक्ष्य केल्याने आंतरराष्ट्रीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

इराणने दिले होते संरक्षण, पण...

इराणने पाकिस्तानच्या २० जहाजांना होर्मुझमधून येण्या-जाण्यासाठी विशेष परवानगी दिली होती. या माध्यमातून इराणने पाकिस्तानी जहाजांच्या सुरक्षिततेची हमीही घेतली होती. पाकिस्तानने आतापर्यंत यातील चार पासेसचा वापर केला होता. मात्र, मंगळवारी जेव्हा पाकिस्तानचे दोन जहाज या मार्गावर आले, तेव्हा तिथे तैनात असलेल्या अमेरिकन सैन्याने त्यांना पुढे जाण्यास सक्त मनाई केली. अमेरिकेच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानची ही जहाजे निमूटपणे मागे फिरली आहेत.

मध्यस्थीच्या प्रयत्नांना खीळ?

येत्या दोन दिवसांत इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात शांती करारावर चर्चा होणार आहे. यासाठी पाकिस्तान सरकार अत्यंत सक्रिय होते. अशा महत्त्वपूर्ण चर्चेच्या तोंडावरच अमेरिकेने ही कारवाई केल्याने पाकिस्तानसाठी हा मोठा कूटनैतिक धक्का मानला जात आहे. अमेरिकेने ओमानची खाडी आणि अरबी समुद्रात १० हजार सैनिक तैनात करून नाकेबंदी जाहीर केली आहे. तरीही इतर देशांच्या जहाजांना सूट आणि पाकिस्तानला बंदी, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पाकिस्तानची प्रतिक्रिया

या घटनेवर पाकिस्तान सरकारने अधिकृतपणे काहीही बोलण्यास नकार दिला असला, तरी जहाजरानी मंत्री जुनैद अनवर चौधरी यांनी कबूल केले की, पाकिस्तानला सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. "आम्ही सतत चर्चा करत असून या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत," असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पाकिस्तानच्या जहाजरानी विभागातील एका अधिकाऱ्याने हतबलता व्यक्त करताना म्हटले की, "जेव्हा इराणने रस्ता रोखला होता तेव्हा आम्हाला इतकी काळजी नव्हती, पण आता खुद्द अमेरिकेनेच आम्हाला रोखले आहे." आता ही कोंडी फुटणार की अमेरिका पाकिस्तानची नाकेबंदी कायम ठेवणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan's peacemaking bid fails as US blocks ships in Hormuz.

Web Summary : US blocked Pakistani ships in Hormuz Strait, disrupting peace efforts between Iran and US. Despite Iranian guarantees and ongoing peace talks, the action raises questions about US intentions, leaving Pakistan in a difficult position.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर