Join us
Daily Top 2Weekly Top 5

"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:19 IST

"संजय राऊत यांचा आदित्य ठाकरे यांना पूर्ण विरोध असून ते कार्याध्यक्ष होऊ नयेत यासाठी त्यांचा गट कार्यरत आहे."

"उबाठा गटात आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत ही थेट लढत पहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष बनवण्याची तयारी उबाठा गटात सुरू असल्याबद्दल मला माहिती नाही, असे संजय राऊत सांगत आहेत. हे निर्णय पक्षात होतात. मग संजय राऊत तुम्ही पक्षाबाहेर आहात का? उद्धव ठाकरे यांच्यानंतर उबाठा गटाची धुरा आपल्याकडेच यावी यासाठी संजय राऊत प्रयत्नशील असून त्यासाठी एक गट हाताशी धरून ते प्रयत्न करत आहेत," असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला.

"संजय राऊत यांचा आदित्य ठाकरे यांना पूर्ण विरोध असून ते कार्याध्यक्ष होऊ नयेत यासाठी त्यांचा गट कार्यरत आहे. त्यातूनच 'आदित्य ठाकरे घरी बसतात, ते महाराष्ट्रात फिरत नाहीत' अशा वावड्या पसरवण्याचे कामही संजय राऊत गटातल्या काहींनी दिल्लीत बसून केले. कारण संजय राऊत यांना स्वतःला पक्षप्रमुख व्हायची इच्छा आहे. उद्धव ठाकरे यांच्यानंतर उबाठा गटाची धुरा स्वतःकडे ठेवण्यासाठी संजय राऊत प्रयत्नशील आहेत. म्हणूनच आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना कुठलीही कल्पना न देता परस्पर कार्याध्यक्ष बनण्याची रणनीती आखली आहे. आता आदित्य ठाकरे यांचा गट विजयी होतो का संजय राऊत यांचा गट हे पहावे लागेल," असा टोला बन यांनी लगावला.

"येत्या दीड वर्षात संजय राऊत यांच्या खासदारकीची मुदत संपते आहे आणि त्यावेळी आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष असतील तर संजय राऊत यांना पुढची खासदारकी आणि पुढचे मुख्य प्रवक्तेपदही मिळणार नाही. त्यामुळे संजय राऊत यांचा पत्ता कट होणार आहे असल्याने त्यांचा या सगळ्या प्रकरणाला विरोध आहे," असा दावा नवनाथ बन यांनी केला.

"महाराष्ट्राची फाळणी होणार नाही. फाळणी तुमच्या पक्षाची झाली आहे. त्याकडे लक्ष द्या. ४०० आमदार कुठे बसणार असा प्रश्न संजय राऊत यांना पडतोय. लोकसभेत आता जवळपास साडेपाचशे खासदार आहेत मग महाराष्ट्राच्या विधानसभेत 400 आमदार बसायला काय अडचण आहे? तुमच्या पक्षाचे दोन तुकडे पडले ते तुकडे तुम्हाला सांभाळता आले नाहीत. तुम्ही महाराष्ट्राच्या फाळणीबद्दल गप्पा करू नका. महाराष्ट्र हा एक संघ आहे आणि एक संघच राहील," असे नवनाथ बन यांनी सुनावले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Raut attempts to control Uddhav Thackeray group, faces Aaditya?

Web Summary : BJP's Navnath Ban claims Sanjay Raut seeks control of the Thackeray group, opposing Aaditya's leadership. Raut allegedly fears losing influence and future positions if Aaditya rises. Ban dismisses concerns about Maharashtra's division, criticizing Raut's party's fragmentation.
टॅग्स :आदित्य ठाकरेसंजय राऊतशिवसेनाउद्धव ठाकरेभाजपा