शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:45 IST

काळ्या यादीत टाकलेल्या एका इराणी सुपरटँकरने अमेरिकेची नाकेबंदी झुगारून होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे. इराणी नौदलाने सांगितले की, ट्रॅकर चालू असलेल्या या टँकरने आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीतून इराणी किनाऱ्यावर सुरक्षितपणे प्रवास केला.

अमेरिकेने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) घातलेली कडक नाकेबंदी मोडीत काढल्याचा मोठा दावा इराणने केला आहे. अमेरिकेने 'काळ्या यादीत' टाकलेले इराणचे एक अतिविशाल कच्च्या तेलाचे जहाज (Supertanker) आपला ट्रॅकर (Tracking System) चालू ठेवून उघडपणे नाकेबंदी ओलांडून इराणी किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले आहे.

शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!

मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने 'एक्स' वर यासंदर्भात पोस्ट केली आहे. ट्रम्प यांनी हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केल्याची आणि इराणचा सागरी व्यापार रोखल्याची घोषणा केली होती. मात्र, कोणतीही लपवाछपवी न करता इराणने हे जहाज सुरक्षितपणे नेल्याने अमेरिकेच्या नाकेबंदीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सुपरटँकरने आपल्या संपूर्ण प्रवासात आपली ट्रॅकिंग प्रणाली चालू ठेवली होती. त्यामुळे, त्याने अमेरिकेच्या नाकेबंदीला झुगारून कोणत्याही अडथळ्याशिवाय आपल्या गंतव्यस्थानी पोहोचले,असे  इराणच्या दूतावासाने सांगितले.

अमेरिकेची नाकेबंदी

यापूर्वी, अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नाकेबंदी सुरू केल्याची घोषणा केली होती, यामुळे इराणी बंदरांमधून येणाऱ्या कोणत्याही जहाजांना प्रवेश मिळणार नाही आणि इराणला टोल देणारी कोणतीही जहाजे रोखली जातील.

इराणची अर्थव्यवस्था सुमारे ९० टक्के सागरी आंतरराष्ट्रीय व्यापारावर अवलंबून आहे. नाकेबंदी लागू झाल्यानंतर ३६ तासांच्या आतच, अमेरिकी सैन्याने इराणमधील सागरी मार्गाने होणारा आर्थिक व्यापार पूर्णपणे थांबवला, असेही अमेरिकेने म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran openly challenges US naval blockade in Strait of Hormuz.

Web Summary : Iran claims to have breached the US blockade in the Strait of Hormuz. An Iranian supertanker, openly tracking, safely reached Iranian shores, challenging the effectiveness of the US naval blockade and raising questions about American claims.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर