गेल्या काही वर्षांपासून सोन्याची विक्रमी खरेदी करणाऱ्या जगातील प्रमुख केंद्रीय बँकांनी आता आपला मोर्चा विक्रीकडे वळवला आहे. रशिया, फ्रान्स, तुर्किए आणि पोलंड यांसारख्या देशांच्या केंद्रीय बँकांनी सोन्याची सतत विक्री सुरू केल्याने जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. जानेवारी २०२६ मध्ये सोन्याने १.८० लाख रुपये प्रति १० ग्रॅम असा ऐतिहासिक टप्पा गाठल्यानंतर आता दरांमध्ये १२% पर्यंत घसरण पाहायला मिळत आहे.
बँका सोनं का विकतायत? १. चलन वाचवण्यासाठी संघर्ष: अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत ($१२० प्रति बॅरल). यामुळे अनेक देशांच्या चलनावर दबाव आला असून, आपले चलन सावरण्यासाठी बँका सोन्याची विक्री करून रोकड उभी करत आहेत.२. युद्ध आणि संरक्षण खर्च: रशियाने युक्रेन युद्धाचा खर्च भागवण्यासाठी गेल्या दोन महिन्यांत १४ टन सोनं विकलं आहे. तर पोलंडने आपल्या संरक्षण खर्चासाठी सोन्याचा साठा वापरण्याचे संकेत दिले आहेत.३. फ्रान्सचा रणनीतिक निर्णय: फ्रान्सने अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हमध्ये ठेवलेला आपला सोन्याचा साठा काढून घेतला असून, नफा कमावण्यासाठी त्याची विक्री आणि पुनर्खरेदीचे धोरण अवलंबले आहे.४. नफा वसुली : सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर असल्याने अनेक देश या संधीचा फायदा घेऊन आपला नफा खिशात टाकत आहेत.
बाजारावर काय परिणाम झाला?या विक्रीच्या सत्रामुळे सोन्याच्या किमतीत जानेवारीपासून मोठी घसरण झाली आहे. जो सोन्याचा साठा बाजारासाठी एक 'भक्कम भिंत' मानला जात होता, तीच भिंत आता कोसळताना दिसत आहे. तुर्किएने सुमारे ६० टन, तर रशियाने सातत्याने विक्री सुरू ठेवल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Web Summary : Central banks of Russia, Turkey, and others are selling gold to stabilize currencies, cover war expenses, and capitalize on high prices, causing market decline.
Web Summary : रूस, तुर्की जैसे देशों के केंद्रीय बैंक मुद्रा स्थिर करने, युद्ध खर्चों को पूरा करने और उच्च कीमतों का लाभ उठाने के लिए सोना बेच रहे हैं, जिससे बाजार में गिरावट आ रही है।