Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा

२०२३ च्या हंगामापासून LSG चा कणा आहे निकोलस पूरन, पण...

By सुशांत जाधव | Updated: April 15, 2026 17:11 IST

Open in App

Nicholas Pooran Failed To Score Runs In IPL 2026 : रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स संघाची यंदाच्या हंगामातील कामगिरी 'कभी खुशी कभी गम...' अशी राहिली आहे. पहिल्या ४ सामन्यापैकी २ विजय आणि २ पराभवासह LSG संघ गुणतालिकेत ४ गुणांची कमाई करत सातव्या क्रमांकावर आहे. या संघाकडून गोलंदाजांनी आपली जबाबदारी चोख बजावली. पण आघाडीच्या फलंदाजांनी प्रत्येक सामन्यात दगा दिलाय. त्यातील एक नाव म्हणजे निकोलस पूरन. २१ कोटींसह रिटेन केलेला हा स्फोटक बॅटर आपल्या संघासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

निक्कीचा 'निकम्मा' शो!  २१ कोटींच्या बॅटरमुळे LSG चं टेन्शन वाढलं 

कॅरेबियन स्टार निकोलस पूरन टी-२० क्रिकेटमधील सर्वात खतरनाक फलंदाज म्हणून ओळखला जातो. पण आयपीएलच्या यंदाच्या हंगामात त्याची बॅट काही तळपलेली नाही. पहिल्या ४  सामन्यातील ४ डावात निकोलस पूरन याने फक्त ४१ धावा केल्या आहेत. यात १९ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. मध्यफळीत खेळताना पूरन याने अनेकदा संघाला एकहाती सामने जिंकून दिले आहेत. पण यंदा अजून तरी त्याचा तो जलवा दिसलले नाही. LSG च्या संघासाठी ही मोठी चिंतेची बाब आहे.

५००० रुपयांचा डाव खेळला तरी... LSG मालक Sanjiv Goenka यांच्या स्वभावावर शमीचं संदर्भासह स्पष्टीकरण 

पूरनमुळे संघ अडचणीत

निकोलस पूरनच्या पदरी सातत्याने येणारे अपयश हे LSG चा संघ सातव्या क्रमांकावर असण्यामागचं एक कारण आहे. अनुभवी फलंदाजाच्या फ्लॉप शोमुळे संघातील अन्य युवा फलंदाजांवर दडपण येत आहे. परिणामी संघाची एकंदरीत कामगिरी ढासळताना दिसते. LSG च्या ताफ्यातून कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुकूल चौधरीची बॅट तळपली. फिनिशरच्या रुपात तो आगामी सामन्यात LSG साठी हुकमी एक्का ठरू शकतो. पण मध्यफळीत निकोलस पूरन चमकला नाही तर या खेळाडूवरचा दबावही वाढेल. त्यामुळे निकोलस पूरनचा कमबॅक LSG साठी महत्त्वपूर्ण असेल. तो आपल्या जुने तेवरमध्ये खेळत पैसा वसूल शो दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.

२०२३ च्या हंगामापासून LSG चा कणा आहे निकोलस पूरन

२०२३ च्या हंगामात LSG च्या संघाने १६ कोटी मोजत निकोलस पूरन याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. धमाकेदार फलंदाजीमुळे  आयपीएल २०२५ च्या हंगामाआधी त्याची पगारवाढ झाली. LSG च्या संघाने त्याला २१ कोटींसह रिटेन केले. यंदाच्या हंगामातही त्याला याच प्राइज टॅगसह संघात ठेवले. गत हंगामात त्याने १४ सामन्यात १९६.२५ च्या स्ट्राइक रेटस ५२४ धावा केल्या होत्या. IPL मधील आतापर्यंतच्या कारकिर्दीत ९४ सामन्यात त्याने १४ अर्धशतकासह ३२.८७ च्या सरासरीसह २३३४ धावा केल्या आहे. LSG च्या ताफ्यात त्याच्यासारखी फलंदाजी अन्य कोणीच करू शकत नाही. जर तो लयीत परतला तर निश्चितच संघाची ताकद वाढेल. याउलच त्याचा खराब फॉर्म कायम राहिला तर संजीव गोएंका यांच्या मालकीचा संघ अडचणीत सापडेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Pooran's poor form: LSG's 21-crore batsman scores only 41 runs.

Web Summary : Nicholas Pooran's poor performance is hurting Lucknow Super Giants. The 21-crore batsman has scored only 41 runs in four matches. His failure puts pressure on other batsmen. LSG needs Pooran to return to form quickly to boost their chances.
टॅग्स :आयपीएल २०२६लखनौ सुपर जायंट्सरिषभ पंतरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर