मध्यप्रदेश बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच पन्ना जिल्ह्यातील एका सामान्य विद्यार्थिनीने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. 'सरस्वती ज्ञान मंदिर हायस्कूल', गुनौरची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी प्रतिभा सिंह सोलंकी हिने ५०० पैकी ४९९ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या दैदिप्यमान यशामुळे केवळ पन्ना जिल्हाच नव्हे तर संपूर्ण मध्यप्रदेशात आनंदाची लाट उसळली आहे. 'न्यूज १८' शी खास संवाद साधताना प्रतिभाने आपल्या यशाचं श्रेय आई-वडील आणि शिक्षकांना दिलं. ती म्हणाली, "माझ्या पालकांनी आणि शिक्षकांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. मी दररोज नियमितपणे ४-५ तास अभ्यास करायचे. मोबाईलचा वापर मी कमी करायचे. मी पूर्णपणे सेल्फ स्टडीवर भर दिला, कोणतंही कोचिंग लावलं नव्हतं."
प्रतिभा म्हणाली की, शाळेतून घरी आल्यावर ती सर्वात आधी होमवर्क पूर्ण करायची, त्यानंतर थोडा वेळ खेळायची. रात्री ती गांभीर्याने अभ्यास करायची. रात्री जे काही वाचलं असेल, त्याची सकाळी उजळणी ती नक्की करायची. अभ्यासात काही शंका असल्यास शाळेतील शिक्षक त्या शंकांचं त्वरित निरसन करायचे आणि घरी आई-बाबाही अभ्यासात मदत करायचे.
'सरस्वती ज्ञान मंदिर' सारख्या एका लहान शाळेतून इथपर्यंत मजल मारणं, हे प्रतिभाची मेहनत, शिस्त आणि 'स्मार्ट स्टडी'चं जिवंत उदाहरण आहे. ४९९ गुण मिळाल्याबद्दल प्रतिभा खूप आनंदी आहे. ती म्हणते, "इतके गुण मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. हे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या स्वप्नांना पूर्ण करणारं यश आहे."
प्रतिभाच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि पन्ना जिल्ह्यातील नागरिक तिचं भरभरून अभिनंदन करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रतिभाला शुभेच्छा दिल्या आहेत. निकाल जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी तिचं कौतुक करताना म्हटलं होतं की, "पन्नामधून खऱ्या अर्थाने हिरा बाहेर आला आहे." त्यांनी प्रतिभाची तुलना हिऱ्याशी केली आहे.
Web Summary : Madhya Pradesh's tenth-grade topper, Pratibha Singh Solanki, achieved 499 out of 500 through self-study, limited mobile use, and consistent 4-5 hour daily study sessions. She prioritized homework, played briefly, and reviewed nightly lessons in the morning. Parents and teachers provided unwavering support, enabling her success.
Web Summary : मध्य प्रदेश की दसवीं कक्षा की टॉपर, प्रतिभा सिंह सोलंकी ने सेल्फ-स्टडी, कम मोबाइल उपयोग और लगातार 4-5 घंटे की दैनिक अध्ययन सत्रों के माध्यम से 500 में से 499 अंक प्राप्त किए। उन्होंने होमवर्क को प्राथमिकता दी, संक्षेप में खेला और सुबह रात के पाठों की समीक्षा की। माता-पिता और शिक्षकों ने अटूट समर्थन दिया, जिससे उन्हें सफलता मिली।