वृंदावन येथील यमुना नदीत झालेल्या भीषण बोट दुर्घटनेत लुधियानाच्या राजिंदर कौर यांच्यासाठी सोशल मीडियावर पाहिलेली काही सेकंदांची एक रील 'देवदूत' ठरली. इन्स्टाग्रामवर पाहिलेल्या लाईफ सेव्हिंग टिप्समुळे त्या मृत्यूच्या दारातून सुखरूप परतल्या आहेत.
राजिंदर कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी यमुनेच्या लाटा भयंकर अंगावर येत होत्या आणि बोट उलटली होती. अशा कठीण प्रसंगी त्यांना इन्स्टाग्राम रीलमध्ये पाहिलेल्या काही टिप्स आठवल्या. त्यांनी पाण्याखाली आपलं तोंड घट्ट बंद ठेवलं, श्वास रोखून धरला आणि हात-पाय मारत स्वतःला पाण्याच्या पृष्ठभागावर टिकवून ठेवलं.
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
मृत्यूवर मात करून बाहेर पडलेल्या राजिंदर यांनी केवळ स्वतःचा जीव वाचवला नाही, तर धैर्याचे दर्शन घडवत एका तरुणाला आणि दुसऱ्या एका महिलेला बाहेर काढण्यास मदत केली. बुडत असताना बोट अनेकदा त्यांच्या डोक्याला आदळली, पण त्यांनी धीर सोडला नाही.
मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
१० एप्रिल रोजी झालेल्या या दुर्घटनेनंतर आतापर्यंत १५ भाविकांचे मृतदेह सापडले असून, एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. राजिंदर कौर यांच्या म्हणण्यानुसार, ही दुर्घटना स्टीमर ओव्हरलोड असल्यामुळे नाही, तर यमुनेवर बांधल्या जाणाऱ्या पुलाच्या दोरीमध्ये नाव अडकल्यामुळे झाला आहे.
Web Summary : A woman survived the Vrindavan boat accident thanks to life-saving tips learned from an Instagram reel. Rajinder Kaur recalled the tips, kept her mouth shut, held her breath, and floated until rescued. She also helped save a man and another woman.
Web Summary : वृंदावन नाव दुर्घटना में एक महिला ने इंस्टाग्राम रील से सीखे जीवन रक्षक सुझावों के कारण अपनी जान बचाई। राजिंदर कौर को वो सुझाव याद आए, उन्होंने अपना मुंह बंद रखा, सांस रोकी और बचाए जाने तक तैरती रहीं। उन्होंने एक पुरुष और एक अन्य महिला को बचाने में भी मदद की।