आखाती देशात वाढता तणावात ओमान पुन्हा चर्चेत आला आहे. ओमानच्या बंदरावरही इराणी ड्रोनकडून हल्ले करण्यात आले. ज्यात पोर्टवरील एका क्रेनचे नुकसान झाले आणि परदेशी कर्मचारी जखमी झाला. २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही ओमान दौऱ्यावर गेले होते. ओमान आणि भारताच्या चलनाबाबत कायम चर्चा होत राहतात. त्यामुळे भारताचे १० हजार रुपये ओमानचे किती होतात आणि इतक्या पैशात तिथं काय-काय खरेदी करू शकाल हे जाणून घेऊया.
सध्याच्या एक्सचेंज रेटनुसार एक ओमानी रियालची किंमत भारतीय चलनात २३० ते २४५ रूपयांच्या आसपास असते. त्यामुळे भारताचे १० हजार रुपये हे ४२ ते ४३ ओमानी रियाल इतके असू शकतात. ही रक्कम भलेही कमी वाटत असेल परंतु ओमानी रियालला जगातील मजबूत चलनांपैकी एक मानली जाते. त्यामुळे त्याची क्रयशक्ती बरीच जास्त आहे.
१० हजारांत किती दिवस राहू शकता?
जर तुम्ही ओमानला १० हजार रूपये घेऊन गेलात तर त्या पैशात जास्त दिवस ओमानमध्ये घालवणे सोपे नाही. सामान्यत: एवढ्या पैशात तुम्ही १ किंवा जास्तीत जास्त २ दिवस मर्यादित खर्चात काढू शकता. हेदेखील तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही रस्त्यावरील स्ट्रीट फूड खाल आणि महागड्या हॉटेल, ट्रान्सपोर्ट टाळाल. या देशात राहण्याचा खर्चही अपेक्षापेक्षा जास्त आहे. एक दिवसाचा बेसिक खर्चही वाढू शकतो.
१ लाख रुपयात ओमानमध्ये काय शक्य आहे?
जर तुम्ही बजेट वाढवून १ लाख रूपये घेऊन गेलात तर त्याची किंमत ४०० ओमानी रियालपर्यंत आहे. या रक्कमेत ओमानमध्ये किमान १ महिना खर्च चालवू शकतो. शहराच्या बाहेरील परिसरात एक बेडरूम भाड्याने घेतले तर त्याची किंमत १५० ते २५० रियाल इतकी आहे. खाण्यापिण्यासाठी ७० ते १०० रियाल खर्च होऊ शकतात. वाहतूक आणि इंधनासाठी २५ ते ४० रियालमध्ये काम चालेल. वीज, पाणी, इंटरनेटसारख्या गोष्टींसाठी २५ ते ५० रियाल खर्च होऊ शकतो. म्हणजे एकूण मिळून १ महिन्याच्या बजेटसाठी ही रक्कम पुरेशी ठरेल.
दरम्यान, ओमानचे चलन मजबूत असण्यामागे त्या देशातील स्थिर अर्थव्यवस्था हे मोठे कारण आहे. याठिकाणी तेल आणि नैसर्गिक गॅसचा साठा आहे. ज्यातून इथला महसूल उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे. त्याशिवाय लोकसंख्या कमी असल्याने प्रति व्यक्ती उत्पन्नही जास्त आहे आणि परदेशी चलनाचा साठाही मजबूत आहे.
Web Summary : With ₹10,000, you can spend 1-2 days in Oman, focusing on street food and avoiding expensive options. ₹1 lakh allows a month's stay, covering rent, food, transport, and utilities, thanks to Oman's strong economy driven by oil and gas.
Web Summary : ₹10,000 में ओमान में 1-2 दिन बिता सकते हैं, सड़क के खाने पर ध्यान केंद्रित करके। ₹1 लाख में एक महीने का खर्च चल सकता है, जिसमें किराया, भोजन, परिवहन और उपयोगिताएँ शामिल हैं, ओमान की तेल और गैस से चलने वाली मजबूत अर्थव्यवस्था के कारण।