शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 14:07 IST

तब्बल ४७ अनुभवी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांची फौज या एका प्रकरणाच्या तपासासाठी तैनात करण्यात आली आहे...

अमरावती: संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या परतवाडा येथील अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल प्रकरणाने आता एक नवे वळण घेतले आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आणि तपासात कोणतीही कसर न सोडण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथकाची ‘एसआयटी’ची घोषणा केली आहे. तब्बल ४७ अनुभवी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांची फौज या एका प्रकरणाच्या तपासासाठी तैनात करण्यात आली आहे.परतवाडा पोलीस ठाण्यात १३ एप्रिल रोजी रात्री नोंदवण्यात आलेल्या या गुन्ह्यात पोक्सो व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कडक कलमांन्वये कारवाई सुरू आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि समाजातील वाढता संताप लक्षात घेता, सहायक पोलीस अधीक्षक तथा आयपीएस डॉ. शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करणार आहे. विशेष म्हणजे, या पथकात सायबर सेल, स्थानिक गुन्हे शाखा आणि विविध पोलीस ठाण्यातील तज्ज्ञ कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात तीन पोलिस निरीक्षक, चार सहायक पोलिस निरीक्षक व तीन पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. ​आक्रमक पाऊल: कोणालाही सोडणार नाही!​पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की, जोपर्यंत या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत या पथकातील कोणत्याही कर्मचाऱ्याला इतर कोणतेही काम दिले जाणार नाही. याचाच अर्थ, पोलीस आता पूर्ण ताकदीनिशी केवळ या गुन्ह्याचा छडा लावण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. अश्लील व्हिडिओ तयार करणारे, त्यात सहभागी असणारे आणि ते व्हायरल करून पीडितांच्या सन्मानाशी खेळणाऱ्या प्रत्येकाचा आता ‘हिशोब’ चुकता केला जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Paratwada Obscene Video Case: SIT Formed, Expect More Arrests

Web Summary : A Special Investigation Team (SIT) of 47 officers has been formed to investigate the Paratwada obscene video case. Police are determined to bring all involved in creating and spreading the videos to justice, focusing solely on this case.
टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला