शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 13:49 IST

1 / 7
केंद्र सरकारने देशातील तेल आणि गॅस पुरवठ्याबाबत एक नवीन निवेदन प्रसिद्ध केले आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल आणि गॅसचे टँकर येत असल्यामुळे देशातील गॅस पुरवठा सुरळीत आहे.
2 / 7
आतापर्यंत देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा भासलेला नाही, तसेच कोणत्याही एजन्सीने तुटवड्याची नोंद केलेली नाही. मध्य-पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर, ९९% गॅस सिलिंडरची नोंदणी आणि पुरवठा केला जात आहे.
3 / 7
केंद्र सरकारने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, देशातील ७० टक्के व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्ण होत आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांच्या माहितीनुसार, १४ मार्चपासून १,८२९,००० टन व्यावसायिक गॅसची विक्री झाली आहे. गॅस सिलेंडर बुकिंग आणि पुरवठ्यातील फसवणूक टाळण्यासाठी ओटीपी-आधारित बुकिंग लागू केले जात आहे. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल, त्याशिवाय सिलेंडर उपलब्ध होणार नाही.
4 / 7
सुजाता शर्मा यांच्या माहितीनुसार, एकल कामगार वर्गासाठी एजन्सींनी ५-किलोग्रामचे छोटे सिलिंडर सुरू केले आहेत, हे केवळ ओळखपत्र दाखवून खरेदी करता येतील. पत्त्याचा पुरावा आवश्यक नसेल.
5 / 7
३ एप्रिलपर्यंत ४०,००० मिनी सिलिंडर विकले आहेत. २३ मार्चपासून आतापर्यंत एकूण १३,३०,००० किलोग्राम गॅस सिलिंडर विकले आहेत. नैसर्गिक वायूच्या श्रेणीमध्ये, १०० टक्के पुरवठा घरगुती पीएनजी आणि सीएनजी वाहनांसाठी आहे.
6 / 7
खतांची ९५ टक्के मागणी पूर्ण झाली आहे. शाळा, महाविद्यालये, शीतगृहे, अन्न प्रक्रिया उद्योग आणि औषधनिर्माण उद्योगाला १०० टक्के गॅस पुरवठा होत आहे. गरजेनुसार राज्यांना अतिरिक्त व्यावसायिक गॅस सिलिंडरचाही पुरवठा केला जात आहे. स्वयंपाकाच्या गॅससाठी पीएनजी जोडण्यांना प्रोत्साहन दिले जात आहे आणि जे पीएनजी जोडण्या घेतील, त्यांना त्यांच्या एलपीजी जोडण्या परत करण्यास सांगितले जाईल, असेही सुजाता शर्मा यांनी सांगितले.
7 / 7
केंद्र सरकारमधील अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी सांगितले की, २०,४०० मेट्रिक टन एलपीजी गॅस घेऊन जाणारा टँकर १४ एप्रिल रोजी गुजरातच्या कांडला बंदरात दाखल झाला. या टँकरने ११ एप्रिल रोजी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली होती.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर